◻️ विखे पाटील कुटुंबाचा खंदा समर्थक हरपला
◻️ जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी उप सरपंच, सेवा सोसायटी सदंस्य आदि पदावर यशस्वी कारकीर्द
संगमनेर Live | राजकारणात राहूनही विकासचं समाजकारण करता येत यांचा वस्तुपाठ ज्यानी पिप्रींसह परिसरातील गावाना घालून दिला असे संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूर गावच्या जनसेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक व माजी उप सरपंच मधुकर कारभारी गिते (वय - ५५) यांचे प्रदिर्घ आजाराने आज शनिवारी सकाळी नाशिक येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने आश्वीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
दिवगंत मधुकर गिते हे विखे पाटील परिवाराचे खंदे समर्थक तसेच एक अभ्यासु व सदैव मदतीला धावून येणारे व्यक्तीमत म्हणून राहाता व संगमनेर तालुक्यात प्रसिध्द होते. पिप्रीं - लौकी अजमपूर गावच्या विकासात महत्वाची भुमिका बजावताना गावचे मार्गदर्शक प्रा. कान्हू गिते यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना ना. विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यानी गावात विकासाची गंगा आणण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. गावातील नागरीकाच्या सुख दु:खात नेहमी ते आग्रभागी राहत असल्याने गावाला नेहमी आधार देणारा मोठ्या मनाचा विश्वासू सहकारी गमावल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दिवगंत मधुकर गिते हे उच्चशिक्षित व्यक्तीमत्व असल्याने त्यानी गावातील ग्रामपंचायतीचे पाच वर्ष उप सरपंच पद, पाच वर्ष ग्रामपंचायत सदंस्य पद, श्री क्षेत्र मोठ्या बाबा यात्रा कमिटी सदंस्य पद, सप्ताहा कमिटी सदंस्य पद तसेच शेतकऱ्याची कामधेनू असलेल्या सेवा सोसायटीचे विद्यमान सदंस्य अशा विविध पदावर काम करताना आपल्या कामातून सामाजिक, धार्मिक क्षेत्रात आपली अमिट अशी छाप उमटवली होती.
दिवगंत मधुकर गिते यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजय, एक बहिन, मेव्हणे असा मोठा परिवार असून गावच्या जडण घडणीत सदैव योगदान देणारे हरिभाऊ गिते व रमेश गिते यांचे ते बंधु तसेच सचिन गिते व साईनाथ गिते यांचे ते वडील होते.
दरम्यान दिवगंत मधुकर गिते यांचा अत्यविधी शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिप्रीं - लौकी अजमपूर येथिल ब्राम्हण ओढा याठिकाणी होणार असल्याची माहिती त्याच्यां निकटवर्तीयानी दिली आहे.