◻️ दूध उत्पादकांना दिपावलीनिमित्त प्रतिलिटर साडेचार रुपये रिबेट
◻️ किराणा वस्तू व फराळाचे ही केले वाटप
◻️ संस्थेकडे स्वःताच्या मालकीचा पाच हजार लिटर क्षमतेचा चिलिंग प्लॅट
◻️ २०० दुध उत्पादक ; रोज ३ हजार लिटर दुधाचे संकलन
संगमनेर Live | शेतकरी, शेतमजुर व दुध उत्पादक हा संस्थेचा खरा आधारस्तंभ असतो. त्यांनी केलेल्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा म्हणुन १० वर्षापुर्वी अवघ्या ५० लिटर दुधावर सुरु केलेली महालक्ष्मी सह दुध संस्था ही दुध उत्पादकांच्या विश्वासावर अल्पावधीत प्रगती पथावर गेली आहे. संस्था प्रति दिवस २५०० ते ३००० लिटर दुधाचे संकलनाबरोबरचं योग्य भाव देत असल्याने महालक्ष्मी दुध संस्था दुध उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याचे गौरोउद्गार संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक भारतराव गिते यानी काढले.
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर (पिंप्री फाटा) येथील महालक्ष्मी सह दुध संस्थेकडून दिपावलीनिमित्त दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ४.५० (साडेचार रुपये) रिबेट व अनामत तसेच किराणा व दिवाळी फराळाचे वाटप संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक भारतराव गिते व चेअरमन रमेशशेठ गिते यांच्या हस्तें करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना भारतराव गिते बोलत होते.
यावेळी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वधारण सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दुध उत्पादक बबनराव घुगे होते. संस्थेचे चेअरमन रमेशशेठ गिते, संचालक कैलासराव गायकवाड, रावसाहेब लावरे, पांडुरंग गिते, विलास गिते, गप्पुर गिते, बाबासाहेब म्हस्के, गणपतराव गिते, भाऊसाहेब मुंढे, दशरथ घुगे, बाळासाहेब म्हस्के, अर्जुन गिते, गोवर्धन गिते, जनार्धन दातीर, डॉ. रंगनाथ गिते, डॉ. पप्पु दराडी, चांगदेव आव्हाड याच्यासह दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
भारतराव गिते पुढे म्हणाले की, ही संस्था राज्याचे महसुल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील तसेच माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजुर व दुध उत्पादक यांच्या हितासाठी तसेच दुधाला उच्च दर, पशुखाद्य,जनावरांचे आरोग्य यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेने स्वःताच्या मालकीचा पाच हजार लिटर क्षमतेचा चिलिंग प्लॅट उभारला असून २०० दुध उत्पादकांच्या सहकाऱ्याने रोज ३ हजार लिटर दुध संकलन केले जाते. त्यामुळे दुध उत्पादकांना वेळेत पेमेंट व दुध वाढीसाठी अर्थसाह्य करून संस्था अल्पावधीत शेतकऱ्याच्या विश्वासास पात्र ठरली असल्यांचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रमेशशेठ गिते म्हणाले कि, सध्या दुध धंद्यात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पण मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळात कमी भाव, दुध बंद अशा परिस्थितीमध्ये दुध उत्पादक शेतकऱ्याना संस्थेने आधार दिला. सध्या शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय दुध धंदा असुन त्यांनी घातलेल्या दुधाला योग्य दर मिळावा म्हणुन संस्था कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त करून दुध उत्पादकांनी चांगल्या प्रतीचे दुध संस्थेला पुरवावे. संस्था निश्चीत आणखी प्रगतीपथावर जाण्यासाठी खरा आधार हा दुध उत्पादक असुन त्यांच्या प्रत्येक अडचीमध्ये आम्ही उभे राहू व शेतकऱ्यांना दुध वाढी साठी संस्था नेहमीच मदत करेल अशी ग्वाही त्यानी दिली.
दरम्यान या सभेचे सुत्रसंचलन व आभार मॅनेजर अशोक दराडी यांनी मानले आहे.