चणेगाव येथे भोसले व अवचर कुटुंबियांना मारहाण

संगमनेर Live
0
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात २१ जणावर गुन्हा दाखल

◻️ १० जण जखमी

◻️ चणेगाव ग्रामस्थांकडून मारहाणीचा निषेध

संगमनेर Live | सोमवारी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील भोसले व अवचर कुटुंबियांना गावातीलच एका कुटुंबाकडून बाहेरील माणसे आणुन मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीमध्ये दोन महिलांचा हात फॅक्चर झाला तर एकाच्या डोक्याला मार लागला आहे. त्यामुळे या घटनेचा चणेगाव ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला असून या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात प्रशांत दत्तु अवचर यांनी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बाबुराव वाघमारे, ज्ञानेश्वर एकनाथ साळवे हे धनंजय अवचर व साहेबराव भोसले यांच्या घराची शुटिंग काढत होते. त्यामुळे माझी चुलती लता अवचर हिने शूटिंग का कढता.? असे विचारले असता बाबुराव वाघमारे यानी शिविगाळ करत कोणालातरी फोन केला. त्यानंतर पंधरा मिटानी आठ जण दुचाकीवरुन आले. 

त्यामध्ये बाबुराव वाघमारे यांचा मुलगा ऋषीकेष वाघमारे सात अनोळखी इसम होते. त्याना बाबुराव वाघमारे व ज्ञानेश्वर साळवे यांनी काहीतरी सांगितल्यामुळे ते आमच्या घराकडे काठ्या, पाईप, शॉकप्सर, दगड घेऊन पळत आले. यावेळी ते साहेबराव भोसले व धनंजय अवचर यांच्या घरात घुसले व झोपलेल्या व्यक्तीना मारहाण केली. यामध्ये दत्तु रामचंद्र अवचर, गयाबाई दत्तु अवचर, धनंजय रामचंद्र अवचर, साहेबराव गोविंद भोसले, तेरेजा साहेबराव भोसले, लताबाई धनंजय अवचर व सचिन साहेबराव भोसले (सर्व रा. चणेगाव, ता. संगमनेर) हे जखमी झाले आहेत. 

त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर क्रमांक १९५/२०२२ नुसार भादंवी कलम ४५२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ व ५०६ प्रमाणे बाबुराव वाघमारे (रा. झरेकाठी, ता. संगमनेर), ज्ञानेश्वर एकनाथ साळवे (रा. चणेगाव, ता. संगमनेर), ऋषीकेष बाबुराव साळवे (रा. झरेकाठी, ता. संगमनेर) व सात अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या तक्रांरीत ज्ञानेश्वर एकनाथ साळवे यांनी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास धनंजय रामचंद्र आवचर हा जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिविगाळ करत माझ्यावर धावून आला. त्यामुळे मी आई, वडील व बाबुराव वाघमारे याना सांगितले. त्यामुळे माझ्या आई-वडीलानी धनंजय आवचर यांस शिविगाळ का करता.? असे विचारले असता मारहाण केली. त्यामुळे याबाबत मुलाना हकीगत सांगितल्यानतंर तुम्ही आमच्या वडीलाना का मारले.? असा जाब विचारला असता लाकडी दांडा, दगड व विटांनी मारहाण करण्यात आली. तसेच दुचाकीवर दगड मारुन दुचाकीचे नुकसान करण्यात आले. यावेळी बाबुराव वाघमारे, ऋषिकेश बाबुराव वाघमारे, अभिषेक बाबुराव वाघमारे हे जखमी झाले आहेत.

त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर क्रमांक १९६/२०२२ नुसार भादंवी कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४ व ५०६ प्रमाणे धनजंय रामचंद्र आवचर, लताबाई धनंजय आवचर, साहेबराव गोविंद भोसले, तेरेजा साहेबराव भोसले, सचिन साहेबराव भोसले, विजय गोविंद भोसले, प्रशांत दत्तु अवचर, शुभम विजय भोसले, नितीन साहेबराव भोसले (सर्व रा. चणेगाव, ता. संगमनेर), प्रशांत आवचर तसेच आणखी दोन महिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अवचर व भोसले कुटुंबीय हे चणेगाव येथील एक गरीब व कष्टकरी कुटुंब असल्याने त्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद गावात उमटले व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी ग्रामस्थांना दिले. 

याप्रसंगी चणेगावचे सरपंच अशोक खेमनर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक मच्छिंद्र पावडे, पोलीस पाटील भाऊराव लोहाळे, शहाजी खेमनर, कृषी भूषण विठ्ठलदास आसावा, भास्कर ढमक, विवेकानंद लोहाळे, ज्ञानेश्वर खेमनर, अनिल पाटोळे, बाजीराव खेमनर, राजेंद्र खेमनर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुढील चार दिवसात या घटनेतील सर्व आरोपींना अटक न केल्यास आश्वी पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

तर या मारहाणी दरम्यान झालेल्या आरडाओरडीमुळे अनेक जण दुचाकी जागेवरच सोडून पळाले होते. त्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी आरोपींना वेळीच आवरले असते तर....

चार महिन्यांपूर्वी अवचर कुटुंबातील लताबाई अवचर यांना मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर करण्यात आल्यामुळे फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्याचंवेळी जर पोलिसांनी आरोपींचा बंदोबस्त केला असता तर आज ग्रामस्थावर निषेध करण्याची वेळ आली नसती असा थेट आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !