◻️ आश्वी खुर्द येथे हल्ला करणारा तो बिबट्या अखेर १४ दिवसानी जेरबंद
◻️ आणखी बिबट्ये असल्याने पिजंरा लावण्याची स्थानिकाची मागणी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल शेतकरी दामोधर विश्वनाथ क्षिरसागर यांच्यावर सोमवार दि. १० ऑक्टोबर रोजी सांयकाळी बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली होती. यामध्ये दामोधर क्षिरसागर हे थोडक्यात बचावले होते. मात्र या बिबट्याच्या दहशतीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे याठिकाणी वनविभागाने पिजंरा लावल्यानतंर तब्बल १४ दिवसानी या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेतकरी दामोधर क्षिरसागर यांच्यावर काही दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्या पायाला बिबट्याने पंजा मारल्यामुळे दुखापत झाली होती. यामुळे नागरीकानी मागणी केल्यामुळे वनविभागाकडून याठिकाणी पिजंरा लावून त्यामध्ये कुत्रा ठेवला होता.
परंतू ८ ते १० दिवसापासून बिबट्या या पिजंऱ्याला हुलकावणी देत होता. त्यामुळे वनविभागाने स्थानिक शेतकऱ्याच्या मदतीने कुत्र्याऐवजी पिजंऱ्यात कोबंडी ठेवली. त्यामुळे कुत्र्याला न भुललेला बिबट्या मात्र कोबंडीला फसल्यामुळे दिपावलीच्या मध्यरात्री २.१५ वाजेच्या सुमारास पिजंऱ्यात जेरबंद झाला आहे.
माहिती मिळताचं मंगळवारी पहाटे वनविभाचे वनपाल उपासनी, पी. आर. गागरे, बी. सी. चौधरी, हरिचंद्र जोझार, सुखदेव सुळे, महेश वाडेकर यानी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला ताब्यात घेत निबांळे येथिल रोपवाटिकेत हालवले आहे. तर हा २ वर्षाचा नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
दरम्यान यावेळी शिवा क्षिरसागर, शिवा पवार, शंकर पवार, रामनाथ क्षिरसागर आदिसह स्थानिक नागरीक उपस्थित होते. मागील अनेक दिवसापासून या परिसरात आणखी बिबट्याचा वावर असल्याने या रस्त्यावर हायमँक्स दिवे बसवण्यासह पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक शेतकरी व नागरीकानी पुन्हा केली आहे.