संगमनेर Live | समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांच्या निवासस्थानी नुकताचं सहा फूट लांबीचा धामण साप आढळून आला असून सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने या धामण सापाला सुरक्षित निसर्गात मुक्त केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे इंदोरीकर महाराज राहत असलेल्या निवासस्थाच्या आवारात गुरुवारी दुपारी साप नजरेस पडल्यामुळे मोठी धादंल उडाली होती. आरडाओरडा झाल्याने साप चपळाईने कुपंणालगत असलेल्या झुडपात शिरला.
त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या संजय गायकवाड याच्या मनाला तो विषारी नाग असल्याची शंका चाटून गेली. त्यामुळे त्यानी आश्वी खुर्द येथिल संर्पमित्र शिवप्रसाद पवार याला फोन करुन तात्काळ घटनास्थळी येण्याची विनंती केली.
माहिती मिळताचं घटनेचे गांभिर्य लक्षात घेत संर्पमित्र शिवप्रसाद पवार याने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अलगद या सापाला झुडपातून बाहेर काढले. तो पर्यंत भितीने उपस्थिताची चागलीचं गाळण झाली होती. परंतू संर्पमित्र शिवप्रसाद पवार याने उपस्थिताच्या मनातील भिती दूर करत हा नाग नसून बिनविषारी धामण असल्याची माहिती दिल्याने उपस्थितानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान यावेळी हभंप सौ. शालिनीताई महाराज इंदोरीकर, इंदोरीकर महाराजाचे वाहन चालक संजय गायकवाड आदिसह नागरीक उपस्थित होते. यानतंर संर्पमित्र शिवप्रसाद पवार याने या धामण सापाला सुरक्षित निसर्गात मुक्त केले आहे.