◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार “ ग्रंथोत्सवाचे ” उदघाटन
संगमनेर Live (अहमदनगर) | ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदगनगर यांच्यावतीने येथील पेमराज सारडा महाविद्यालयात शुक्रवार व शनिवार दि. १८ व १९ नोव्हेंबर, २०२२ रोजी भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेल्या “ग्रंथोत्सव २०२२" चे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता या ग्रंथोत्सवाचे उदघाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास अहमदनगर महापालिकेच्या महापौर श्रीमती रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार शंकरराव गडाख, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, आमदार लहू कानडे, आमदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले, ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर, हिंद सेवा मंडळ, अहमदनगरचे कार्याध्यक्ष अनंत फडणीस, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपूळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तत्पूर्वी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असुन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार येणार असुन या ग्रंथदिंडीचा मार्ग करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा चौक), लालटाकी रोड ते पेमराज सारडा महाविद्यालय असा असणार आहे.
उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर ग्रंथोत्सवाच्या पहिल्या सत्रात दुपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत ग्रंथालय आणि वाचन संस्कृती या विषयावरील परिसंवाद होणार असुन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पेमराज सारडा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. माहेश्वरी गावीत हे भुषविणार आहेत तर प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्रा.डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, डॉ.कैलास दौंड, प्रा. डॉ. राजाराम घुले, श्रीमती शिल्पा रसाळ हे वक्ते या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी २.३० ते ४ या वेळेत अहमदनगर जिल्ह्यातील साहित्य आणि साहित्यिक या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक श्रीमती सुमती लांडे ह्या असणार आहेत तर साहित्यिक संजय कळमकर, भुषण देशमुख, सदानंद भणगे,डॉ. संजय बोरुडे, शशिकांत शिंदे, प्रा.डॉ. शिरिष लांडगे, किशोर मरकड यांचा सहभाग असणार आहे.
तिसऱ्या सत्रामध्ये दुपारी ४ ते ५.३० या वेळेत होणाऱ्या प्रभावी वाचन माध्यमे परिसंवादात पत्रकार सर्वश्री शिवाजी शिर्के, प्रकाश पाटील, सुधीर लंके, अनिरुद्ध देवचक्के, राजेंद्र झोंड, अनंत पाटील, मिलिंद बेंडाळे, विजयसिंह होलम, सुभाष गुंदेचा, महेंद्र कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, मिलिंद देखणे, रामदास नेऊलकर, मोहनीराज लहाडे आदी सहभागी होणार आहेत.
शनिवार दि. १९ नोव्हेंबर ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कवी संमेलनाने होणार असुन सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे हे राहणार असून सिने गीतकार व साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारी १२ ते १.३० या वेळेत ग्रंथांनी मला काय दिले या परिसंवादच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक लहु कानडे हे उपस्थित राहणार असून या परिसंवादामध्ये वक्ते म्हणून प्रा. डॉ. चं.वि.जोशी, प्रा. मेधा काळे, डॉ. सौ. सुधा कांकरिया, श्रीमती भुपाली निसळ, प्राचार्य एम. एम. तांबे, शब्बीर शेख आदींची उपस्थिती असणार आहे.
दुपारी २.३० ते ४ या वेळेत आम्ही असे घडलो.. परिक्षेतून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे राहणार असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे व उद्योजक, वक्ता व लेखक एन. बी. धुमाळ यांचे मार्गदर्शन होणार आहे.
सायं. ४ ते ५ या वेळेत ग्रंथोत्सव २०२२ चा समारोप करण्यात येणार असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक जयंत येलुलकर हे उपस्थित राहणार आहेत तर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, हिंद सेवा मंडळाचे मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, पेमराज सारडा महाविद्यालयचे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.