◻️ जिल्हापरिषद शाळेतील चिमुकल्याना दिले लाडूचे जेवन
◻️ ग्रामपंचायत सदंस्य विजय म्हसे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
संगमनेर Live | युवानेते खा. सुजय विखे पाटील यांचा २४ नोव्हेंबर हा वाढदिवस मोठ्या उत्साहात संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे साजरा करण्यात आला असून यावेळी ग्रामपंचायत सदंस्य विजय म्हसे यांनी वाढदिवसानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत जिल्हापरिषद शाळेतील चिमुकल्याना लाडूचे जेवन दिल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
यावेळी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, जेष्ठ नेते भाऊपाटील गायकवाड, विनायकराव बालोटे, भाऊसाहेब जऱ्हाड, सुमतीलाल गांधी, संजयशेठ गांधी, सुशीलकुमार भंडारी, बाळासाहेब सांगळे, अशोक जऱ्हाड, पंडीत म्हसे, मच्छिद्रं गायकवाड, विनायकराव जऱ्हाड, भारतराव जऱ्हाड, तुळशिराम निघुते, कारभारी म्हसे, सतिष उर्फ कांता जऱ्हाड, भिमा शिदें, अजय ब्राम्हणे, वसंत गायकवाड, शिवाजी गायकवाड, अभिजित म्हसे, पंकज नाके, सतिष म्हसे, प्रविण उंबरकर, किरण गायकवाड, रणजित गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, निलेश चोपडा, संदीप चतुरे, राजेद्रं गायकवाड, संपत शिदें, अनिल वर्पे तसेच जनसेवा कार्यालयाचे अनिल गायकवाड, दिपक सोनवणे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी चिमुकल्याच्या हस्तें केक कापून खा. डॉ. सुजय विखे पाटील याच्यां नावाचा जयघोष करत शुभेच्छां देण्यात आल्या. यावेळी अँड. शाळीग्राम होडगर, विनायकराव बालोटे आदिनी वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना खा. डॉ. विखे पाटील तसेच कुटुंबियाची अनोख्या शैलीत ओळख करुन दिली. त्यामुळे चिमुल्यानी टाळ्याचा गजर करत त्याना दाद दिली.
दरम्यान याप्रसंगी उपस्थित जिल्हापरिषद शाळेतील चिमुकल्याना लाडूचे गोड जेवन खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाकडून देण्यात आल्यामुळे उपस्थित सर्वचं जेष्ठ कार्यकर्त्यानी विजय म्हसे यांचे कौतुक केले.
खासदार होणे सोपे, डिग्री मिळवणे अवघड..
खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे राजकारण व समाजकारणात धुरधर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटील कुटुंबात जन्माला आले असले तरी जमीनीशी नाळ जोडलेला नेता अशी स्वच्छ व स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. एक वेळ खासदार होणे सोपे आहे. परंतू एमबीबीएस, एमडी व न्युरोसर्जन या डिगऱ्या मिळवणे अवघड आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यानी खासदार म्हणून वयोश्री योजना असेल विकास कामासाठी निधी असेल त्यामध्ये नगर जिल्ह्याचे नाव देशात ठळकपणे उमटवले आहे. कार्यकर्त्याचे त्याच्या भोवताली असलेले मोहळ व त्याच्या कामाची पध्दत पाहता २०२४ च्या निवडणूकीनतंर केद्रांत मंत्री होण्यापासून कोणीही त्याना रोखू शकणार नाही. त्यामुळे त्याच्यासारखी विकासाची दृष्टी असलेला नेता नगर जिल्ह्याला मिळाला हे आपले भाग्य असल्याचे गौरोउद्गार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यानी काढले आहे.