संगमनेर Live | कोणत्याही क्षेत्रात उतरल्यानतंर हाती घेतलेले काम हे सर्वोच्च शिखरावर न्यायचे.. त्यासाठी हवी असणारी कुशाग्र बुध्दीमता, संयम व निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी आंगिकारल्या तरंच ध्येय पुर्णत्वास जात असते. याचांच वस्तूपाठ घालून देणारे हुशार, संयमी व्यक्तीमत्व म्हणून संगमनेर तालुक्यातचं नव्हे तर जिल्ह्यात अँड. शाळीग्राम होडगर साहेब यांची ख्याती आहे. या चतुरस्र व्यक्तीमत्वाच्या वाढदिवसानिमित्त केलेला हा लेख प्रपंच..
शिक्षण प्रसारातून समाजपरिवर्तनाचे स्वप्नं पाहणारा एक दृष्टा समाजचितंक असलेल्या अँड. शाळीग्राम होडगर साहेब यांचा अध्यात्म, क्रीडा, विज्ञान, साहित्य व राजकीय क्षेत्रात चतुरस्र वावर आहे, आज त्याचा वाढदिवस. शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तीमत्व असलेले होडगर साहेब सामाजिक व राजकीय क्षेत्रातही स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्याकडे जाणाऱ्या गोर-गरीब जनतेला हा माणूस सदैव मदत करत असल्याने सर्वसमान्य माणसाच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळ्या उंचीचा आदर निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
पैसै कमावणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळा, महाविद्यालय व रुग्णालय उभारणारे अनेक सम्राट महाराष्ट्राने अनुभवले आहेत. परंतू केवळ संस्कारी पिढी घडवण्याचे ध्येय उराशी बाळगत या माणसाने विविध संस्था उभारत सुसज्ज अशा आरोग्य सुविधाही नाममात्र दरात ग्रामीण भागात उपलब्ध करुन दिल्या आहेत.
होडगर साहेब यानी एकलव्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय,अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय, अश्विन नाथकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अश्विन महाविद्यालय फार्मसी, अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम औद्योगिक प्रक्षिक्षण केद्रं (आय.आय.टी), अश्विन पँरामेडीकल सायन्स महाविद्यालय, एकलव्य डी. एड. महाविद्यालय, यशंवतराव होळकर पब्लिक स्कूल, नाथकृपा कृपा मिल्क अँण्ड अँग्रो प्रा. लि. रखमाई डेअरी व गोपालन गोसंवर्धन केद्रं, सुर्या नर्सिंग महाविद्यालय (आर.जी.एन.एम/आर.ऐ.एन.एम) या संस्था उभारत त्या यशाच्या शिखरावर नेल्या आहेत.
मांचीहिल शिक्षण संस्थेत बालवाडी पासूनचं मुला-मुलीना सैनिकी शिक्षण, ज्यूडो-कराटे आदिचे शिक्षण दिले जाते. मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाची सुविधा देखील येथे उपलब्ध आहेत. यामध्ये व्याख्यान, किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या कला गुणाना वाव देण्याचे काम केले जाते. दहावी बारावी परिक्षेसह शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवता यादीत मांचीहिल संकुलाचे सर्वाधिक विद्यार्थी झळकत असले तरी त्यामागे अँड. होडगर साहेबाचे नियोजन आहे. त्यामुळेचं राज्य व जिल्हा पातळीवर या शिक्षण संस्थेच्या गुणवत्तेचा दबदबा निर्माण झाल्यामुळे या संस्थेत आपल्या पाल्याने शिक्षण घ्यावे असा कल पंचक्रोशीतील पालकामध्ये दिसत असल्यामुळेचं संस्थेच्या विविध शाखेत २ हजार २०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असताना ३०० पेक्षा अधिक कर्मचारी याठिकानी कार्यरत आहेत.
होडगर साहेब यांना आतापर्यत १७ पुरस्कार मिळाले असून उत्तम प्रशासक असल्याने त्यानी शिक्षण संस्थेबरोबरचं राजकीय व सामाजिक क्षेत्रावरही आपल्या कार्यकर्तुत्वाची अमिट अशी छाप सोडली आहे. विज्ञाननिष्ठ असलेला हा माणूस सर्व धर्माचा अभ्यासू असा चिकित्सक असल्याने प्रत्येक धर्माची खडानखडा माहिती ठेवून आहे. अध्यात्मिक क्षेत्रातही मोठे वलय या माणसाने आपल्या आवती भवती गुफंल्याने पंचक्रोशीतील प्रत्येक कार्यक्रमात त्याचे अमुल्य असे योगदान नेहमी असते.
मांचीहिल सारख्या खडकाळ माळरानावर आज त्यानी झाडा-फुला-फळाची लागवड केल्यामुळे लाबून पाहणाऱ्याला डोगंराने हिरवा शालू परिधान केल्याचे दिसत असले तरी ते सर्व श्रेय हे होडगर साहेबाचे असल्याचे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही.
अशा सदैव निसर्गाशी रममान असलेल्या व ज्ञानगंगेसाठी अविरतपणे झटणाऱ्या ज्ञानयोगी.. अँड. शाळीग्राम होडगर साहेब याना आज वाढदिवसानिमित्त संगमनेर Live व श्री स्वामी समर्थ उद्योग समुह आश्वी खुर्द परिवाराकडून अनंत शुभेच्छा.!
***फोटो सौजन्य :- भाऊसाहेब ताजणे, आश्वी बुद्रुक**