◻️ उंबरी बाळापूर येथे त्याच्या सततच्या वावराने होती मोठी दहशत
◻️ उप सरपंच नानासाहेब उंबरकर व नागरीकाच्या मदतीने वनविभागाने डाव साधलाचं
संगमनेर Live | प्रवरा नदी तिरावरील गावानमध्ये मागील अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत असून संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ले करणारा बिबट्या नुकताचं जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्यामुळे परिसरातील नागरीकानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उंबरी बाळापूर परिसरात मागील अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत आहे. काही दिवसापूर्वी गावातील शेतकरी मच्छिद्रं खेमनर यांच्या गोठ्यातील कालवडीला बिबट्याने हल्ला करत ठार केले होते. त्यानतंर सातत्याने बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने नागरीकानमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरीकानी गावचे कर्तव्यदक्ष उप सरपंच नानासाहेब उंबरकर यांच्याशी संपर्क करुन या ठिकाणी पिजंरा लावण्याची मागणी केली होती.
यावेळी उप सरपंच नानासाहेब उंबरकर यांनी तात्काळ वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करुन घटनेचे गांभीर्य त्याच्या लक्षात आणून देत याठिकाणी पिजंरा लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे उंबरी बाळापूर येथे वनविभागाचे वनरंक्षक अशोक गिते व नागरीकाच्यां मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिजंरा लावण्यात आला होता. या पिजंऱ्यात बिबट्याला भक्ष्य म्हणून स्थानिकानी ४ ते ५ बॉयलर कोबंड्या ठेवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोबंड्याच्या लोभापायी बिबट्यात पिजंऱ्यात घुसला व अडकला. त्यामुळे बिबट्याने जोरजोरात ओरडत पिजंऱ्याला धडका देण्यास सुरवात केल्यामुळे बिबट्या पिजंऱ्यात अडकल्याचे स्थानिक नागरीकाच्या लक्षात आले व त्यानी वनविभागाला याबाबत माहिती दिली.
दरम्यान मध्यरात्री वनविभागाला माहिती मिळताचं वनविभागाचे वनपाल प्रशांत पुंड, वनरंक्षक साळू सोनवणे, अशोक गिते, रवी पडवळ व जारवाल यानी घटनास्थळी दाखल होत रात्री १ वाजेच्या सुमारास बिबट्याला पिजंऱ्यासहित ताब्यात घेतले आहे. यासाठी उप सरपंच नानासाहेब उंबरकर, धोंडीबापू खेमनर, आबा माळवदे, बाबासाहेब खेमनर, रामराम भुसाळ, नवनाथ भुसाळ, दत्ता काळे, सुनील डांगे, सखाराम भुसाळ, तुषार खेमनर, शिवाजी वावरे, दत्ता माळवदे, साहेबराव थोरात, रघु बर्डे, बारकू बर्डे, सचिन अंजनकर, गोरख माळवदे, शंकर शिखरे आदिसह परिसरातील नागरीकानी मोठे सहकार्य केले असून २ वर्ष वयाचा नर बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.