◻️ पंतप्रधान मोदी, ना. अमित शहा, ना. नितीन गडकरी यांच्यासह केंद्र व राज्यातील मातब्बर राजकीय मंडळींकडून कौतुकाची थाप
सुजयदादा.. ज्यांच्या नावातच विजय आहे, असे राजकारण विरहीत नवनिर्मीतेचे स्वप्नं साकारणारा सृजनशील व कृतिशील व्यक्तीमत्व म्हणजे सुजयदादा.!
एक उच्च विद्या विभुषीत (एम.सी.एच.न्युरोसर्जरी) असणाऱ्या लोभस व्यक्तीमत्वाने आपल्या स्व-कतृत्वाने अगदी अल्प काळातच आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा जनमाणसाच्या मनावर उमटविला आहे. स्व आणि परिस्थिती यांचा सुयोग्य संगम जिवनात अंगी बाळगण्याचे बाळकडु आजोबा स्व. खा. पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचेकडून मिळाल्याने प्रत्येक विषयाचा सखोल तर्कसंगत व शास्त्रीय अभ्यास करून प्रश्नांची सोडवणूक करण्याचे यशस्वी काम दादा करत आहेत.
आपल्या अलौकीक नेतृत्व शौलीच्या जोरावर आज विविध संस्थेंचे नेतृत्व करताना पुर्ण तन् मन् धनाने काम करत असताना संस्थेबरोबर कामगार, सभासद व शेतकरी यांचे हीत जोपासण्याचे काम याद्वारे केले गेले. एकुण समुहाच्या कार्यावर ज्या व्यक्तीचा निर्विवाद प्रभाव असतो, जी व्यक्ती समुहामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते, जिच्यामुळे समुहाचे मनोबल व एकंदर समुहशक्ती टिकून राहते आणि जी व्यक्ती समुहाच्या अभिववृत्तीमध्ये बदल घडवून आणू शकते ती व्यक्ती म्हणजे त्या समुहाचा नेता होय.
थोडक्यात नेता म्हणजे उचीत ध्येय्य धोरणांची पुर्ती करणारा देवदूत होय. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी नेतृत्वाची निर्मीती झालेली आहे. याप्रमाणे दादांच्या नेतृत्वशौलित वरील सर्व बाबी ओतप्रोत भरलेल्या दिसतात. एखाद स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता म्हणजे नेतृत्व होय. नेतृत्च करायला वयाची काही अट नसते. किंबहुना साहस, निर्णय क्षमता, बुद्धी चातुर्य व निर्णय निर्धारण यांचा समन्वय साधत मोठे यशाची शिखरे सहज पार करता येतात हा दृष्टीक्षेप समोर ठेवत प्रत्येक पाऊल विकासात्मक दृष्टीने उचलण्याचे काम याद्वारे करत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण व्यक्तिमत्व म्हणून खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचा राजकारण समाजकारणाचा वारसा राधाकृष्ण विखे पाटील तसेच जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील हे चालवित आहेत.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली युवा नेते खा. डॉ. विखे पाटील यांनी ३ वर्षापूर्वी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर लाखांच्या फरकाने निवडणुकीत विजय संपादन करून संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशात मातब्बर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावतील अशी कामगिरी करून दाखवली. त्यांचे राजकारणासाठी योगदान कौतुकास्पद आहे. खा. सुजय विखे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना अर्थसाहाय्य योजना तसेच मुलांची लग्नाची जबाबदारी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून घेऊन देशात प्रथमच उपक्रम राबविला.
शिर्डी मतदार संघातील १ लाख ५० हजार नागरिकांचा अपघात विमा विण्याची संकल्पना राज्यात एकमेव राहाता तालुक्यात खा. डॉ. विखे पाटील यांनी राबविली. प्रवरा बैंक व पायरेन्स संस्था या माध्यमातून तालुक्यातील १९३ कुटुंबियांना ३ कोटी ७९ लाखांचा आधार देण्याचे काम विखे पाटील कुटुंबियांनी केले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विविध विकास कामे मार्गी लावली.
संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेत असलेला नगर- मनमाड या महामार्गासाठी ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ४३० कोटी रुपये निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नगर दक्षिण व शिर्डी मतदारसंघातील गरजू वयोवृद्ध नागरिकासाठी वयोश्री योजनेच्या माध्यमातून लाखो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना विविध प्रकारचे लागणारे आरोग्य साहित्य वाटप करून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला. वयोश्री योजना यशस्वीपणे राबवून केंद्रात व राज्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
करोना काळात रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध आ. करून प्रवरानगर (लोणी) व विळदघाट याठिकाणी जम्बो कोविड सेंटरची उभारणी करून हजारो करोना रुग्णांना वेळेवर उपचार देऊन त्यांना जीवदान देण्याचे काम केले. संपूर्ण देशात ऑक्सिजन व रेमेडिसिबीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना राहाता व विळदघाट याठिकाणी ऑक्सीजन प्लांटची निर्मिती तसेच रेमेडिसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत. करोना रुग्णांना आधार देण्याचे काम केले आहे.
खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिण मतदार संघा बरोबरच राहाता व शिर्डी मतदार संघातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी कोविड सेंटर या ठिकाणी स्वतःची यंत्रणा उभी करून करोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले. प्रवरा पॅटर्नने राबविलेले आरोग्य यंत्रणेचे अनुकरण राज्यातील अनेक ठिकाणी करण्यात आले व ते राज्याला दिशा देणारे ठरले.
राज्यातील राजकारणात विखे पाटील कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणी येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकार चळवळीचा पाया रचला. त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील शाबासकीची थाप यांनी सहकाराबरोबरच शिक्षण शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत बळीराजा सुखी समृद्धी होण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी जनतेसाठी केलेले कार्य सतत स्मरणात राहणारे ठरले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी मतदारसंघ निर्मितीसाठी मोठे योगदान आहे. खा. सुजय विखे पाटील यांनी कांग्रेस पक्षाला रामराम ठोकत सन २०१९ ला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मिळवत प्रथमच खासदार होण्याचा मान मिळवला.
नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच मतदार संघात विविध विकास कामे मार्गी लागावी यासाठी संसदेत अनेकवेळा निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या अभ्यासू व चंचल स्वभावामुळे अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना. अमित शहा, ना. नितीन गडकरी यांच्यासह केंद्र व राज्यातील मातब्बर राजकीय मंडळींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री नसतानाही नगर जिल्ह्याच्या विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना आजाराने सर्वत्र थैमान घातले होते. या भीतीने राज्यातील मंत्री, आमदार, खासदार घराबाहेर पडले नाही परंतु डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबियांनी शासनाला मदतीला प्रवरा यंत्रणा उभी. करून राज्याला 'प्रवरा पॅटर्न राबवल असलेल्या उपक्रमाची वेगळी ओळख करून दिली.
माझा मतदार संघ माझी जबाबदारी' ही संकल्पना मनाशी बाळगून डॉ. विखे पाटील यांनी प्रवरा ट्रस्टच्या माध्यमातून १०० बेडचे कोविड रुग्णालय उभे केले. तसेच अहमदनगर येथे करोना तपासणी प्रयोगशाळा मान्यता मिळून सुसज्ज प्रयोगशाळा उभ्या केल्या. नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन नंबर सुरू केले. आणि लॉकडाऊन मुळे रोजगार नसलेल्या नागरिकांसाठी अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वतःच्या खर्चाने किराणा व रेशन वाटप जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजुंसाठी सिंधुताई अन्नछत्र सुरू करून अनेक गरजू कुटुंबियांसाठी जेवणाची व्यवस्था केली. दररोज हजारो नागरिकांना अन्नाचे पाकिट वाटप अशी अनेक सामाजिक कामे डॉ. सुजय विखे पाटील यांनी राबवले.
मतदार संघातील प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध उपलब्धता व औषध फवारणी करून घेतली. मतदारसंघातील आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व इतर विभागातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी घेत त्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागात थर्मामीटर उपलब्ध करून देत प्रत्येक गावात घरोघरी जाऊन कोविड तपासणी करण्यासाठी सूचना केल्यात. करोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी नगर दक्षिण मतदार संघा बरोबर संपूर्ण शिर्डी मतदारसंघात लसीकरण मोहीम जलदगतीने व्हावी यासाठी करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे सरकार बेडचे दरबारी प्रयत्न केल्याने करोना संसर्ग कमी होण्यास मदत झाली.
तालुक्यात सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद ग्रामपंचायत सोसायटी या सर्व पदाधिकारी यांच्याबरोबर दररोज संवाद साधून करोना बाबतच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करता येत नव्हती. शेतीमालाचे नुकसान होऊ नये यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवून शेतकन्यांना करोना नियमांचे पालन करून जिल्हाधिकारी यांच्याबरोबर सातत्याने चर्चा करून शेतीमालाची विक्री होण्यासाठी प्रयत्न केले. चादळ, गारपीट झालेल्या भागात शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून नुकसान. भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. खासदार असूनही सामान्य माणसात न राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
सामान्य नागरिकांचा प्रश्न सुटावा सामाजिक जाण असलेले कार्यकर्ते निर्माण व्हावेत हाच हेतू आणि उद्दिष्ट समोर ठेवून युवक चळवळीची बांधणी करून तिला गती देण्याचे काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्ग मोठ्या संख्येने आकर्षित झाला आहे. दूरदृष्टी, संघटन, जिद्द, कौशल्य गुणांची पारख धडाडीची कार्यपद्धती, निष्ठा अशा अनेक गुणांचे एक अजब रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. लोकांचा विश्वास अचूक निर्णय या जोरावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व सहकारात अमूल्य आग्रह परिवर्तन घडवले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विविध विकास कामे राबवून खऱ्या अर्थाने जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्याचे काम खा. सुजय विखे पाटील हे आ. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जोडीला रंगरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनीही समाजसेवेचा ध्यास घेतला आहे. युवा नेते खा. सुजय विखे पाटील यांची अष्टपैलू कामगिरी अशीच बहरत आहे. विकासाची शस्रक्रीया करुन नवनिर्मीतेचे स्वप्नं साकारणार करून लोकमान्यता मिळवणाऱ्या सृजनशील नेतृत्वाला संगमनेर Live परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
***माहिती सौजन्य : विनोद पारखे, जनसेवा कार्यालय लोणी***
***लेखक संजय गायकवाड हे संगमनेर Live चे मुख्य संपादक आहेत***