◻️ १ हजार ५८४ पैकी १ हजार ३६० मतदार बजावला मतदानाचा हक्क
◻️ पँनल टू पँनल मतदान ; फटाक्याची अतिषबाजी व पेढे वाटून विजयत्सोव साजरा
संगमनेर Live | टीका, आरोप-प्रत्यारोप एवढंच नव्हे तर, आश्वासनाचा पाऊस पडल्यानतंर शुक्रवारी अश्विनी ग्रामीण पतंस्थेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
यावेळी झालेल्या मतमोजणी निकालात माजी पंचायत समिती सदंस्य गुलाबराव सांगळे व चेअरमन संपतराव सांगळे यांच्या जनसेवा विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व राखत संचालक पदाच्या ११ च्या ११ जागावर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व राखल्यामुळे सत्ता आपल्याचं ताब्यात ठेवली आहे. तर चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत संस्थापक गंगाधर आंधळे गटाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सलग चार ते पाच पंचवार्षिक बिनविरोध झालेली निवडणूक यंदा मात्र ना. विखे पाटील याना मानणाऱ्या दोन गटात एकमत न झाल्यामुळे चुरशीची व ऐतिहासिक झाली. यामध्ये सत्ताधारी जनसेवा विकास मंडळाकडून माजी पचांयत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, विद्यमान चेअरमन संपतराव सांगळे आणि संस्था संस्थापक गटाच्या जनसेवा मंडळाकडून संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे, रंभाजी इलग व विलास आंधळे यांनी प्रामुख्याने प्रचाराची धुरा साभांळल्यामुळे या निवडणुकीला वेगळं महत्व मिळालं होत.
त्यामुळे आज रविवारी मतदान केद्रांवर सकाळपासूनचं मतदान करण्यासाठी सभासद गर्दी करत होते. सायंकाळी उशीरा मतमोजणी झाल्यानतंर जनसेवा विकास मंडळाचे माजी पचांयत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, विद्यमान चेअरमन संपतराव सांगळे याच्या गटाच्या पदरात सभासदानी भरभरुन मताचे दान टाकल्यामुळे ११ च्या ११ संचालक पदाच्या जागा निवडूण आल्या. त्यामुळे कार्यकर्त्यानी फटाके फोडत पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.
दरम्यान यावेळी एकून मतदान १ हजार ३६० झाले असून १५२ मते बाद झाली आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश नारायण कापसे यानी काम पाहिले असून त्याना संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे यानी सहकार्य केले. याप्रसंगी आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शिवाजी पवार, गोपनीय विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार निलेश वर्पे, प्रवीण रणधीर, विजय काळे, ज्योती दिघे, ताराबाई चांदे व रविंद्र ब्राम्हणे आदिनी चोख बदोबस्तं ठेवला होता.
जनसेवा विकास मंडळाच्या विजयी उमेदवाराची नावे व मताची आकडेवारी..
सर्वसाधारण प्रवर्गातून विनित उर्फ गुड्ड दिलिप गांधी (८३९ मते), सखाहरी बाबुराव नागरे (८११ मते), तुळशीराम चांगदेव म्हस्के (७७४ मते), भाऊसाहेब लक्ष्मण लावरे (७७१ मते), वसंत धोडींबा वर्पे (७७८ मते) व संपत बाबुराव सांगळे (८२१ मते)
इतर मागास प्रवर्गातून हरिभाऊ दत्तु ताजणे (८६२ मते)
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून भगवान गोधाजी खामकर (८६६ मते)
महिला राखीव प्रवर्गातून कल्पना गोवर्धन बोद्रें (८७१ मते) व पुष्पा बाळासाहेब भवर (८३९ मते)
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून राजेद्रं लहानु गिते (८९३)
हे ११ संचालक भरघोस मते मिळवून विजयी झाले आहेत.
पराभूत झालेल्या जनसेवा मंडळाच्या उमेदवाराची नावे व मताची आकडेवारी..
सर्वसाधारण प्रवर्गातून विलास मुरलीधर आंधळे (५३१ मते), भिका पढरीनाथ गिते (४५२ मते), रघुनाथ गजाबा जाधव (४३५ मते), केलास किसन नागरे (४४३ मते), हौशीराम बाबुराव फड (५०२) व राजेद्रं बबन बोद्रें (४२८ मते)
इतर मागास प्रवर्गातून रामदास पांडुरंग ताजणे (४८३ मते)
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून संपत देवजी कदम (४७९ मते),
महिला राखीव प्रवर्गातून लीला कैलास नागरे (४९० मते) व वैशाली बबन शिदें (४५९ मते)
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून डॉ. भानुदास सखाराम आंधळे (४५१ मते)
अशी मते मिळाली असली तरी त्याना पराभवाचा सामना करावा लागला आहे.