◻️ शासकीय मानवंदना देऊन सयाश्रू नयानानी त्याच्यांवर प्रतापपूर येथे अत्यंसंस्कार
◻️ १७ वर्ष मातृभूमिची सेवा करणारा वीर सुपुत्र अखेर मायभूमीच्या कुशीत विसावला
संगमनेर Live | भारतीय सैन्यदलात १७ वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत्त झालेले मेजर कैलास हरिभाऊ दराडे (वय - ३८) यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले असून संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर या त्याच्यां मुळगावी शासकीय इतमामात मानवंदना देऊन त्याच्यांवर शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या मोठ्या जनसमुदायाने भारत मातेच्या या वीर सुपुत्राला सयाश्रू नयानानी निरोप दिला आहे.
मेजर कैलास दराडे हे भारतीय सैन्यदलात १७ वर्ष देशसेवा करुन वर्ष दोन वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झाले होते. सैन्यात असताना त्यानी जम्मू - कश्मिर, आसाम, राजस्थान, दिल्ली, पंजाब, पुणे, त्रिपुरा व नगर येथे कर्तव्य बजावले होते. काही दिवसापूर्वी त्याचा अपघात झाला होता.
त्यामुळे उपचारासाठी त्याना संगमनेर, नाशिक व नतंर पुणे येथे दाखल केले होते. शुक्रवारी पहाटे अखेर त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या निधनाची माहिती समाजमाध्यमात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र शोकाकूल वातावरण पहावयास मिळत असून शुक्रवारी सांयकाळी उशीरा त्याच्या प्रतापपूर या मुळगावी त्याच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी आश्वी सह पंचक्रोशीतून आलेल्या जनसमुहाने सयाश्रू नयनानी भारतभुमिच्या या महान सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करताना ‘कैलास दराडे अमर रहे’ या घोषणा दिल्या.
दरम्यान मेजर कैलास दराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय व नातेवाईक असा मोठा परिवार असून प्रतापपूर सह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात मेजर कैलास दराडे याना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी माजी सैनिक, पोलीस अधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवार, स्थानिक ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.