◻️ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुलचे ८ वे वार्षिक सम्मेलन उत्सहात
◻️ प्रवरेत इंग्रजी शिक्षणासोबत प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्द मिळते
संगमनेर Live (लोणी) | शेतकऱ्याच्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण हे केवळ पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील च्या शैक्षणिक दूरदृष्टीमुळेच मिळाले. प्रवरेचा विद्यार्थी हा मोठा झाला तरी समाजहितासाठी कायमचं पुढे असतो असे प्रतिपादन प्रवेश सेंट्रल पब्लीक स्कुलचे माजी विद्यार्थी डॉ. राजेश डेरे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगरच्या ८ व्या वार्षिक सम्मेलनात डॉ. डेरे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, इंग्रजी विभागाच्या संचालिका सुष्मिता विखे पाटील, अतांञिक विभागाचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, कृषि संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डाॅ. शुभांगी साळोखे, स्कुलच्या प्राचार्या रोजमीन बेलीन, प्राचार्य बी. बी. अंबाडे, सुधाकर मोरे आदीसह पालक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. डेरे म्हणाले की, प्रवरेत इंग्रजी शिक्षणासोबत प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्द मिळते. यामुळे लातूरचा भूकंप, कोविडचे संकट यात चांगले काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे तो प्रवरेत आदर्श पद्धतीने घडविला जातो. पुस्तकी ज्ञानासोबतचं कोणत्याही परिक्षेत तो यशस्वी होतो. एक पुस्तक, एक पेन, एक शिक्षक हा विद्यार्थी घडवित असतो. असे सांगुन विद्यार्थ्याच्या पंखात बळ प्रवरा देत असते तुम्ही अभ्यासातून पुढे जा हा संदेश दिला.
पालकांनी मुलांचे लाड करतांना मुलांना काय पाहीजे तेच द्या वेगळे लाड करून नका असे सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सांगुन प्रवरेचा विद्यार्थी हा प्रवरेच्या मुख्य घटक आहे. पालकांनी निश्चित राहून त्यांना आपल्या परिस्थितीची कष्टाची जाणीव करून घावी असे सांगितले.
प्रारंभी प्राचार्या रोजमीन यांनी विविध कार्याचा आढावा घेतला. यावेळी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्याचा गौरवही मान्यवरांनी करत “एक विश्व एक लोक” या लोककलेला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.