◻️ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
संगमनेर Live (अहमदनगर) | अहमदनगर महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ कोटींच्या निधीला आज मंजुरी दिली असल्याची माहीती खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
खड्डेमुक्त अहमदनगरच्या उद्दीष्टपूर्तीसाठी खा. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन २५ कोटींच्या निधीची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून प्रथम ५ कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उर्वरित २० कोटींचा निधी देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली व या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
या निधीच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल करण्याचा मानस व्यक्त करून, लवकरच रस्ते विकासाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचेही खासदार डॉ. विखे यांनी सांगितले.
अहमदनगर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि शहरातील भाजप पदाधिकारी यांनी या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाठपुरावा केल्याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.