◻️ औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही याच दिवशी
संगमनेर Live | महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघासाठी ५ जानेवारीला अधिसूचना निघणार असून १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. ३० जानेवारी २०२३ ला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली असून अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही याच दिवशी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२२ चा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य प्रशासन) उन्मेष महाजन यांनी दिली आहे.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान कॉग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे २००९ पासून प्रतिनिधित्व करत असून यावेळी भाजपकडून त्याना तगडे आवाहन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.