◻️ पानोडी शिवारातील काळूबाईच्या ओढ्यालगतची घटना
◻️ भर दिवसा बिबट्याने शेळी ओढून नेल्याने परिसरात मोठी दहशत
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल काळूबाई ओढ्यालगत बेदरकारपणे वाहण चालवल्याने झालेल्या अपघातात तरसाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. तसेचं शुक्रवारी भर दिवसा बिबट्याने शेळी ओढून नेल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने बदोबस्तं करावा अशी मागणी स्थानिकानी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिवसांगणिक होणारी जंगलतोडमुळे वनांचा ऱ्हास व पाण्याच्या कमतरतेमुळे शिकारीसाठी व पाण्यासाठी जंगली श्वापदे त्यामध्ये प्रामुख्याने बिबट्ये व तरस ही आता आश्वी सह परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस व लपण क्षेत्र असल्याने आश्रयास येत आहेत.
आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील काही दिवसापासून बिबट्याबरोबरचं तरसाचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातचं बेदरकारपणे भरधाव वेगाने वाहण चालवल्याने झालेल्या अपघातात पानोडी - साकूर रस्त्यावरील काळूबाईच्या ओढ्यालगत रस्ता पार करत असलेल्या तरसाचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारत शेवाळे यानी वनविभागाला कळवल्यानतंर कर्मचाऱ्यानी येऊन तरसाला आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान शुक्रवारी भर दुपारी कदम वस्तीलगत असलेल्या तळ्याशेजारी संकेत जालिदंर शिदें हा तरुण शेळ्या चारत होता. यावेळी बिबट्याने थेट शेळ्याच्या कळपात शिरुण एक शेळी ओढूण नेण्याचा प्रयत्न केला. परंतू शिदें याने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेळी तेथेचं टाकून झुडूपात धूम ठोकली. यावेळी शेळ्याचा कळप बिचकल्यामुळे शिदें हे सर्व शेळ्या एकत्र आणण्याचे काम करत असताना बिबट्याने त्याची नजर चुकवून हल्ला केलेली शेळी घेऊन पलायन केले होते. त्यामुळे या परिसरात पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.