◻️ आरोपीमध्ये श्रीरामपूर, कोल्हार तसेचं संगमनेर तालुक्यातील एकाचा समावेश
◻️ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाची मोठी कारवाई
संगमनेर Live | राहाता तालुक्यातील कोल्हार येथे गावठी कट्टे व जिवंत काडतूस बेकायदेशीर रित्या जवळ बाळगणाऱ्या पाच आरोपीसह ९१ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतला असून या आरोपीमध्ये श्रीरामपूर, कोल्हार तसेचं संगमनेर तालुक्यातील एकाचा समावेश असल्याचे पोलीसानी सागितले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके याना कोल्हार बुद्रुक परिसरात गावठी कट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक अनिल कटके यानी सफौ मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संदीप चव्हाण लक्ष्मण खोकले, दिलिप शिदें, राहुल सोळंके, पोकॉ रणजीत जाधव, चापोहेकॉ संभाजी कोतकर व भरत बुधवंत याचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना केले होते.
घटनास्थळी दाखल होताचं पथकाने कोल्हार बुद्रुक येथील गौतमनगर परिसरात सापळा लावला होता. यावेळी सशंयित चार ते पाच जणाना पोलीसानी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यामध्ये दुर्गेश शिदें (ता. श्रीरामपूर), हारुण उर्फ राजू शेख (ता. श्रीरामपूर), अश्पाक उर्फ मुन्ना पटेल (रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता), प्रसन्न लोखंडे (कोल्हार बुद्रुक, ता. संगमनेर), सदानंद मुन्तोडे (रा. शिबलापूर, ता. संगमनेर) अशी नावे त्यानी पोलिसांना सांगितली. त्याच्याकडे अधिक चौकशी करत अंगझडती घेतली असता तीन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतूस असा ९१ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला व तो पोलीसानी जप्त केला आहे.
पोना संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं ६२०/२०२२ नुसार आर्म अँक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई लोणी पोलीस स्टेशन करत आहे. दरम्यान आरोपी दुर्गेश शिदें हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पुणे, नाशिक, जालना, सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत व आर्म अँक्ट प्रमाणे १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उप विभागिय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शन व सुचनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्याच्या सहकाऱ्यानी केली आहे.