◻️ चौधरवाडी येथे सुरु असलेल्या सप्ताहाला सौ. शालिनीताई विखे पाटील यांची भेट
◻️ महिलानो देवावर श्रध्दा ठेवा पण, अंधश्रध्देला बळी पडू नका
संगमनेर Live | राजकारण असो की समाजकारण संताचे आशिर्वाद महत्वाचे असतात. अनेक संताची पावले नगर जिल्ह्याला लागल्यामुळे आपण सर्व भाग्यवंत आहोत. गीता जयंतीच्या मुहुर्तावर आपल्याकडे किर्तण सेवा सुरु आहे. आज या ठिकाणी एखाद्या राजकारण्याची सभा असती तर गाडी पाठवूनही माणसे आली नसती. परंतू सप्ताह सुरु असल्याने परमेश्वराच्या नामस्मरणासाठी येथे भाविकाचा जनसागर उसळला आहे. त्यामुळे आपण कितीही शिकलो अथवा मोठे झालो तरी, संताचे विचारचं आपल्याला तारणार आहेत. असे मनोगत जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यानी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील चौधरवाडी येथे सुरु असलेल्या माणिकगिरी व बिरोबा महाराज फिरत्या सप्ताहाला सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी भेट दिली, याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी हभंप दत्तगिरी महाराज, रोहिनीताई निघुते आदि उपस्थित होते.
यावेळी सौ. विखे पुढे म्हणाल्या की, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभुषन बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळापासून विखे पाटील परिवार हा वारकरी संप्रदायाशी जोडलेला आहे. त्यामुळे जिथे गरज लागेल तिथे विखे पाटील परिवार वारकरी संप्रदायाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल अशी ग्वाही देऊन त्या पुढे म्हणाल्या की, परमेश्वराने आपल्याला अगणित किमतीचा देह दिला आहे. स्वता:साठी सर्वचं जगतात परंतू समाजाचे ही आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना आपल्या मनात असायला हवी.
याप्रसंगी उपस्थित महिलाना आवाहन करताना सौ. विखे म्हणाल्या की, महिलानो देवावर श्रध्दा ठेवा, परंतू आधंश्रध्येला बळी पडू नका. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी, मुलगी सुध्दा घराला प्रकाश देणारी पणती आहे. त्यामुळे मुलाप्रमाणेचं मुलीनाही वाढवा असे त्या म्हणल्या असून किर्तण केवळ ऐकू नका तर आचरणातही आणा असे त्या शेवटी म्हणाल्या आहेत.