◻️ ना. विखे पाटील यानी खा. संजय राऊत याना फटकारले
◻️ उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतीचे वंशज असल्याचे दाखले मागणाऱ्यानी आम्हाला शहाणपणा शिकवू नये
संगमनेर Live | छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे दाखले उदयनराजे भोसले यांच्याकडे मागणाऱ्यानी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. असा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा. संजय राऊत यांना दिला. नुकतीचं सामनाच्या आग्रलेखात ना. विखे पाटील यांच्यावर खा. संजय राऊत यानी टिका केली होती. तसेच खा. राऊत यांच्या शिर्डी दौऱ्याच्या अनुशघाने ना. विखे पाटील बोलत होते.
संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, हिंदुत्वाचा राजकारणासाठी सोयीस्कर वापर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून आपले इंगित साध्य करणारे आता महाराष्ट्र पेटवू पाहात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यापालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होवूच शकत नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वच पिढ्यांचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील वक्तव्य निश्चितच वेदनादायी असल्याचे स्पष्ट करून या विरोधात उदयनराजे भोसले यांच्या ज्या भावना आहेत त्याच सर्व महाराष्ट्राच्या भावना असल्याचे सांगून या विषयावर तसेच आमच्या वक्तव्याचे अनर्थ काढून काहीजण भांडवल करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा हिंदुत्वाला तिलांजली देणारेच राज्यात देवभक्ती आणि देशभक्ती दाखविणाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करीत असल्याची आठवण करून देत मंत्री विखे पाटील म्हणाले की, याच सरकारच्या काळात औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहीली गेली तेव्हा तुमची मनगटे कुठे बांधली गेली होती.? तुमचा मर्दपणा तेव्हा कुठे गेला होता.? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित करत खा. संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.