◻️ ३० हजारच्या रोख रक्कमेसह तीन तोळे सोने ही केले लपास
◻️ चोरी करायला आले, त्याची टाकून दुसऱ्याचीचं दुचाकी घेऊन पळाले
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे शुक्रवारी (२ डिसेंबर) मध्यरात्री संतोष तुकाराम मगर यांच्या राहत्या घरातून चोरट्यानी ३० हजाराच्या रोख रक्कमेसह तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे त्याची दुचाकी घटनास्थळी टाकून देत दुसऱ्याची दुचाकी घेऊन पळून गेले आहेत.
याबाबत संतोष मगर यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी आमच्या बंगल्याचे तारीचे कंपाऊंड कटरच्या साहय्याने कट केले होते. यानतंर बंगल्याच्या किचनच्या बाजूला असलेल्या दरवाजाची कडी कटावणीच्या साहय्याने उचकटवून त्यानी आतमध्ये प्रवेश केला.
यावेळी चोरट्यानी बेडरुममधील कपाटाची उचकापाचक करुन ३० हजार रुपये रोख, दोन तोळे वजणाचा नेकलेस तसेच एक तोळे वजणाची चैन असा ६३ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला. यावेळी लोक येत आसल्याचे पाहूण चोरट्यानी हीरो होडा कंपनीची सीडी डिलक्स दुचाकी (एम एच १७ डब्लू ७९२३) ही जागीच त्यानी सोडून पळ काढला. यावेळी चोरट्यानी काही अतंरावर राहत असलेल्या विश्वनाथ रघुनाथ मगर यांची दुचाकी घेऊन पोबारा केला.
यामुळे आश्वी पोलीस ठाणे येथे गुरंव नंबर २३६/२०२२ नुसार भादंवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आर. बी. भाग्यवान हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.