◻️ प्रवरा नदी पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता डोगंर भागात दिसू लागल्याने दहशत
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात मागील काही वर्षापासून प्रवरा नदी पट्ट्यात बिबट्याचे मोठ्या संख्येने वास्तव्य असल्याने पशुधनाबरोबरचं माणसावर हल्ले होण्याचे प्रकार नेहमी उघडकीस येत असतात. याचं बिबट्यानी आता डोगंर भागात आपले अस्तित्व निर्माण करण्यास सुरवात केली असून एक मादी बिबट्या आपल्या तीन पिल्लासह वरवंडी शिवारात कँमेरात कैद झाल्यामुळे डोगंर भागात बिबट्याचे अस्तित्व सिध्द झाले आहे.
नुकतेचं तालुक्यातील वरवंडी - चौधरवाडी रस्त्यावरुन रात्रीच्या वेळेस प्रवास करताना अंदाजे दीड फूट उंचीची तीन पिल्ले व बिबट्याची मादी रस्त्यावर बसलेली वाहिरा गडाचे प्रमुख हभंप गणेश महाराज यानी प्रवासादरम्यान कैमेऱ्यात कैद केली आहे.
त्यामुळे प्रवरा नदी पट्ट्यात वास्तव्यास असलेले बिबट्ये दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौधरवाडी, वरवंडी आदि ठिकाणी वास्तव्यास असल्याचे या घटनेतून ठळकपणे उजेडात आले आहे. त्यामुळे शेतात जाताना बिबट्या दिसेल का.? शेजारील झुडपात बिबट्या असला तर काय.? कृषिपंपाची वीज रात्र पाळीत असेल तर रात्रीच्या वेळेस पिकाना पाणी कसे भरायचे.? या भितीमुळे शेतकऱ्यामध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान यामुळे आता बिबट्याच्या पावलांचा वावर शेतकरी व शेतमजुरांसह नागरीकाच्या मनात धडकी भरवत असल्याचे चित्र निर्माण होण्यास सुरवात झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.