साईभक्‍तांकडून साईबाबा संस्थानला वर्षभरात ४०० कोटी १७ लाखाचे दान

संगमनेर Live
0
◻️ संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांची माहिती

संगमनेर Live (शिर्डी) | श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला दि. १ जानेवारी २०२२ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या वर्षभराच कालावधीत साईभक्‍तांकडून विविध प्रकारे ४०० कोटी १७ लाख ६४ हजार २०१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

यावेळी जाधव म्‍हणाले, जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोपऱ्यातुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी लाखो साईभक्‍त शिर्डी येथे येतात. साईभक्‍तांकडून दि. १ जानेवारी २०२२ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या वर्षभराच्‍या कालावधीत विविध प्रकारे रोख स्‍वरुपात एकूण ४०० कोटी १७ लाख ६४ हजार २०१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.

यामध्‍ये दक्षिणापेटी मोजणी रुपये १६७ कोटी ७७ लाख १ हजार २७, देणगी काऊंटर ७४ कोटी ३२ लाख २६ हजार ४६४ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी. डी. देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये १४४ कोटी ४५ लाख २२ हजार ४९७ रुपये आदीव्‍दारे रोख स्‍वरुपात ३८६ कोटी ५४ लाख ४९ हजार ९८८ रुपये प्राप्‍त झाले. 

तर २६०५३.२७० ग्रॅम सोने व ३३०२९०.४४० ग्रॅम चांदी याव्‍दारे १३ कोटी ६३ लाख १४ हजार २१३ रुपये देणगी प्राप्‍त झाल्याची माहिती जाधव यानी दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !