◻️ पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पावबाकी, सुकेवाडी परिसरात चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यश उमेश शेळके (नगर कल्याणरोड, अहमदनगर) यांचे तसेच त्यांचे शेजारी राहणारे तीन साक्षीदार यांचे घरी अनोळखी ६ - ७ इसमांनी घराचे दरवाजाचा कडीकोंडा कटावणीने तोडुन आत प्रवेश केला व सामानाची उचकापाचक करुन चाकुचा धाक दाखवुन ४ लाख ३० हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम , एसबीआय व आयसीआयसी बॅकेचे एटीएमकार्ड दरोडा चोरी करुन चोरुन नेले असल्याची तक्रांर कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल केल्यामुळे गु.र.नं. १०५३/२०२२ नुसार भादविक ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी ठिकाणी भेट देवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके याना स्वतंत्र पथक नेमुन या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
तपासादरम्यान पोलिस निरिक्षक अनिल कटके यांना प्रशांत ऊर्फ धोळ्या चव्हाण (रा. सालेवडगांव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर) याने त्याचे ५ ते ६ साथीदारासह गुन्हा केला असुन ते सर्व चिचोंडी पाटील शिवारातील सालेवडगांव रोडवरील माळरानावर लपुन बसले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यामुळे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकिर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरदंले, सचिन आडबल, भिमराज खर्से, दिपक शिंदे, पोकॉ जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मपोकॉ सारीका दरेकर, चापोहेकॉ बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन गुन्ह्याचा तपासासाठी योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
सुचना मिळताचं पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन सालेवडगांव येथे जावुन माळरानाची पहाणी करत असताना त्यांना ६ ते ७ जण एका लिंबाचे झाडा खाली बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते माळरानावर पळु लागले. पथकाने लागलीच पाठलाग करुन दोन संशयीतांना ताब्यात घेतले व त्यांचे इतर साथीदार डोंगरातील झाडा झुडपांचा सहारा घेवुन पळुन गेले. त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. यावेळी पकडलेल्या दोघाची चौकशी केली असता रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण (वय २३) व फिलीप नादर चव्हाण, (वय २३) दोन्ही रा. सालेवडगांव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
यावेळी या आरोपींना किती ठिकाणी व कोठे कोठे दरोडा चोरी केली आहे या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी पावबाकी, सुकेवाडी, ता. संगमनेर येथे घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन चोरी केल्याची कबुली दिली. अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०६३/२०२२ भादविक ३९५ प्रमाणे दरोडा चोरीचा गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने दोन्ही आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी फिलीप नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात दरोडा व घरफोडी करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उविपोअ अजित पाटील, उविपोअ संजय सातव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.