◻️ माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडून नुतन पदाधिकाऱ्याचा सत्कार
संगमनेर Live | काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांची आर्थिक कामधेनू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सुधाकर माधवराव जोशी यांची तर व्हा. चेअरमन पदी ॲड. नानासाहेब गंगाधर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अमृतवाहिनी बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एक मताने ही निवड करण्यात आली. यावेळी राज्याचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, मावळते अध्यक्ष अमित पंडित आदी उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमनपदासाठी सुधाकर जोशी यांच्या नावाची सूचना बापूसाहेब गिरी यांनी मांडली तर राजेंद्र काजळे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमनपदासाठी नानासाहेब शिंदे यांच्या नावाची सूचना अविनाश सोनवणे यांनी मांडली व त्यास ॲड. लक्ष्मण खेमनर यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक शांताराम फड, श्रीकांत गिरी, अण्णासाहेब शिंदे, संजय थोरात, ॲड. लक्ष्मण खेमनर, किसनराव वाळके ,बाबुराव गुंजाळ, किसन सुपेकर, अविनाश कचेश्वर सोनवणे, प्राचार्य विवेक धुमाळ, शिवाजी जगताप, श्रीमती ललिताताई दिघे, सौ कमल मंडलिक, राजेंद्र काजळे, कचरू फड, मॅनेजर रमेश थोरात, माजी उपाध्यक्ष दत्तू खुळे आदी उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बँकेने सभासद, शेतकरी यांचे हित जोपासताना त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी निर्माण करण्याचे काम केले आहे. या बँकेला रिझर्व बँकेचा ऑडिटचा अ दर्जा असून बँकेच्या संचालक मंडळाची ही निवडणूक २०२२-२७ करीता बिनविरोध झाली आहे.
यानंतर चेअरमन पदासाठी युनियन बँकेत उत्कृष्ट शाखा अधिकारी म्हणून काम केलेले व बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले सुधाकर माधवराव जोशी यांची चेअरमनपदी तर सहकार क्षेत्र व पतसंस्थेत मोठा प्रदीर्घ अनुभव असलेले ॲड. नानासाहेब गंगाधर शिंदे यांची व्हाईस चेअरमन पदी एकमताने निवड झाली आहे. यावेळी सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, भाऊसाहेब एरंडे, मिलिंद कानवडे, सुभाष सांगळे, ॲड. आर. बी. सोनवणे, विलास कवडे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे राज्याचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, माजी अध्यक्ष अमित पंडित, उपाध्यक्ष दत्तू खुळे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.