◻️ १ लाख १५ हजार ६३८ मतदारापैकी ५८ हजार २८३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
◻️ २ फेब्रुवारी, २०२३ रोजी निकाल
संगमनेर Live (अहमदनगर) | विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरीतीने व शांततेत पार पडली.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ५०.४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७९ हजार ९२३ पुरुष तर ३५ हजार ७१५ महिला असे एकूण १ लक्ष १५ हजार ६३८ मतदार होते. त्यापैकी ४३ हजार २०६ पुरुष तर १५ हजार ७७ महिला अशा प्रकारे ५८ हजार २८३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान २ फेब्रुवारी, २०२३ रोजी या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहितीही निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची पहाणी केली.