◻️ उद्योजक राजेद्रं मांढरे यांच्या मोबाईल कँमेरात बिबट्या जेरबंद
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात रविवारी मध्यरात्री उद्योजक राजेद्रं मांढरे यानी घराकडे जात असताना एक बिबट्या मुक्त पणे वावरताना आपल्या मोबाईल कँमेरात कैद केला असून परिसरातील नागरीकानी सावध राहावे असे आवाहन केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उद्योजक राजेद्रं मांढरे हे रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास मांढरे वस्तीवरील आपल्या घराकडे चालले होते. यावेळी मांढरे वस्तीवर असलेल्या जिल्हापरिषद शाळेलगत त्याना काही हालचाल जाणवल्याने त्यानी गाडीचा उजेड हालचालीच्या दिशेने वळवला असता त्याना शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या नजरेस पडला. त्यामुळे त्यानी तो बिबट्या आपल्या मोबाईल कँमेरात कैद करत परिसरातील नागरीकाना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान जिल्हापरिषद शाळेलगत बिबट्या वावरताना दिसत असल्याने परिसरातील नागरीकानमध्ये दहशतीचे वातावरण असून या जिल्हा परिषद शाळेत लहान मुले शिक्षण घेत असल्याने पालक वर्गात मोठी भिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे पालकानी मुलाना शाळेत एकटे न पाठवता स्वतः शाळेत सोडवण्यास येणे गरजेचे असून शिक्षकानी व परिसरातील नागरीकानी सावध राहणे गरजेचे आहे. या परिसरात शाळा असल्यामुळे लहान मुलाबरोबरचं मोठी वर्दळ व लोकवस्ती आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिजंरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक नागरीकानी केली आहे.