◻️ प्रथितयश उद्योजक मा. श्री रविंद्रजी बिरोले साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कौठे- मलकापुर येथील खडकाळ माळरानावर अथक प्रयत्नातुन उभारणी केलेल्या श्री गजानन महाराज शुगर लि. (पुर्वीचे नाव युटेक शुगर लि.) या साखर कारखान्याचे अपरिमीत कष्टाने व मेहनतीने नियोजनपुर्वक प्रयत्न करुन सहा गाळप हंगाम कारखान्याचे चेअरमन रविंद्र बिरोले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पुर्ण केल्यामुळेचं ‘होनी को अनहोनी और अनहोनी को होनी’मध्ये बदलणारे.. उद्योजक म्हणून मा. रविद्रं बिरोले साहेब यांचे तालुक्यासह जिल्ह्यात आज आदराने नाव घेतले जात आहे. अशा जिद्द, चिकाटी व उजाड माळरानावर सोनेरी पहाट उगावी यासाठी आहोरात्र झटणाऱ्या प्रथितयश उद्योजक रविंद्र बिरोले यांचा आज ३ मे रोजी वाढदिवस आहे.
१० वर्षापुर्वी साकुर पठार भागात कोणी साखर कारखाना उभारुन कोणी तो यशस्वीरीत्या चालवून दाखवेल असे स्वप्नांतही कोणालाही वाटले नव्हते. मात्र उद्योजक रविद्रं बिरोले यानी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना उभारणीचा संकल्प केला नव्हे तर नैसर्गिक व मानवनिर्मित अडचणीवर यशस्वी मात करत पुर्णत्वास देखील नेला आहे. त्यामुळे शेतातचं ऊसाच्या खोडक्या होण्याऐवजी दोन पैसे शेतकऱ्याना मिळत असल्याने संगमनेर तालुक्यातील कृषी, औद्योगिक, सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतीक विकासाच्या वाटचालीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या मोलाचा हातभार लागत आहे.
असामान्य कर्तुत्व लाभलेले प्रथितयश उद्योजक रविंद्र पुरुषोत्तम बिरोले साहेब यांचे आज बुधवार, दि. ३ मे २०२३ रोजी ५६ व्या वर्षात पर्दापन होत आहे. अशा या उत्तुंग कर्तुत्व लाभलेल्या व्यक्तीस परमपुज्य श्री गजानन महाराज यांचे फार मोठे आर्शिवाद लाभलेले आहेत. सन २०१२-१३ मध्ये कोठेमलकापुरच्या उजाड माळरानावर कारखान्याची उभारणी करण्याचे ध्येय घेवुन संगमनेर तालुक्यात पर्दापन केले. असंख्य मानवनिर्मीत व नैसर्गिक अडचणीचा सामना करत सन २०१७-१८ मध्ये कारखान्याचा पहिला ट्रायल हंगाम तत्कालीन केंद्रीय मंत्री, मा. नामदार नितीनजी गडकरी, तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजु, मा. ना. पंकजाताई मुंडे, मा. ना. राम शिंदे, मा. ना. सुभाषजी देशमुख आदि मान्यवराचे शुभहस्ते संपन्न केल्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील कौठे-मलकापुरच्या उजाड माळरानावर सोनेरी पहाट उजाडली होती.
अशक्यप्राय वाटणारी गोष्ट श्री गजानन महाराजाच्या कृपा आर्शिवादाने शक्य झाली. ध्येय, चिकाटी, जिद्द व अथक परीश्रमानंतर अखेर कृषीपुरक व्यवसाय सुरु होण्याचे स्वप्न पुर्ण झाले. तद्नंतर पुढील प्रत्येक हंगामामध्ये येणाऱ्या अड-अडचणीचा सामना करत तेही हंगाम यशस्वी पार पाडले. आजकाल कारखानदारी ज्या पद्धतीने चालविली जाते त्या पद्धतीने श्री गजानन महाराज साखर कारखाना चालवायाचा नसुन तो सर्वसामन्य शेतकरी, ऊस उत्पादक, शेतमजुर, ऊस तोडणी मजुर व साखर कामगार यांच्यासाठी चालवायाचा आहे. अशा भावना उद्योजक रविंद्र बिरोले व्यक्त करत असतात.
पहिल्याच ट्रायल हंगामात साखर कारखाना व सहविज निर्मीती प्रकल्प एकाच वेळी सुरु करुन महाराष्ट्राच्या साखर कारखानादारीच्या इतिहासात त्याची नोंदसुध्दा रविंद्र बिरोले यानी केली. प्रत्येक साखर कारखाना चांगल्या गळीत हंगामासाठी प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज साखर कारखाना हा ही नियोजनात्मक वाटचालीत सुरु आहे. सर्व साखर कारखाना हे चालले पाहिजे व त्यातील स्पर्धा निकोप आणी सक्षम व्हायला हवी अशी सातत्याने मनोभावना हि उद्योजक रविंद्र बिरोले यांची राहिली आहे.
साकुर पठार भागाला ऊसाचे कोकण बनविण्याचा मनोदय व्यक्त करुन त्या भागात पाणी आणणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ऊस शेतीस चालना देणे. परिसरातील ऊस उत्पादक व शेतकरी यांचा विश्वास संपादन करुन सर्वांना समवेत घेवुन हा प्रकल्प पुर्ण करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. सामुहीक विकासातुन गावचा व परिसराच्या ग्रामीण विकासाला जोड देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आज मितीस श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करुन साखर कारखानदारीतील पुढचा टप्पा सुरु केला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वाटचालीमध्ये परिसरात पोषक व पुरक वातावरण निर्मीती करण्याचे प्रयत्न सुरु आहे. लोकसहभागातुन विविध सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देवुन त्यांना उत्तेजन व प्रेरणा दिली जाते.
अशा चतुरस्र कर्तुत्वाच्या व्यक्तीस उदंड आयुष्य व निरोगी जीवन लाभो अशा शुभेच्छां ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी तसेच श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या उद्योग समुहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार व संचालक मंडळातील सदस्य यांनी वाढदिवसांनिमित्त दिल्या आहेत.
साहेब.. आपणांस ५६ व्या वाढदिवसांच्या संगमनेर LIVE परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छां.!
पत्रकार संजय गायकवाड, 9850981485