शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात संगमनेर बस स्थानकासमोर निषेध आंदोलन

संगमनेर Live
0
◻️ शिवसेना वारकरी भजनी मंडळाचा पुढाकार

◻️ पोलिसांनी वारकऱ्यावर लाठीचार्ज केल्याने महाराष्ट्र हळहळला 

◻️ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाचि कारवाई करा

संगमनेर LIVE | आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कावेबाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगून तात्काळ राजीनामा द्यावा तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाचि कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी आज निषेध व्यक्त करतांना केली आहे.

गेल्या शेकडो वर्षापासून वारकरी हे दिंडी, पालखी घेऊन पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात हि परंपरा प्राचीन असून मुघल काळात देखिल कधी त्यात खंड पडला नाही. मात्र फडणवीस सत्तेत असतांना मागच्याहि वेळी वारकरी आणि वारी बाबत संभ्रमावस्था उपस्थित झाली होती तसेच आत्ताही लाठीचार्जचे पुरावे असतांना गृहमंत्री असलेले फडणवीस हे वारकऱ्यांवर लाठीचार्ज हि न घडलेली घटना आहे असे मान वर करून बोलतात. त्यांना जनाची नाही तर किमान मनाची देखिल वाटत नाही का? असा संतप्त सवाल कतारी यांनी उपस्थित केला. तर घटनाबाह्य सरकारने यावर तात्काळ वारकरी संप्रदायाचि माफी मागावी अन्यथा महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे यांनी म्हटले आहे.

यावेळी संगमनेर पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, संपर्कप्रमुख नरेश माळवे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, संदीप रहाणे व युवा सेनेचे गोविंद नागरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहर शिवसेनेच्या वतीने वारकऱ्यां सोबत दिंडी काढून भजन कीर्तन करत संगमनेर शहर बस स्थानकासमोर शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली व संगमनेर बस स्थानक परिसरात कीर्तन करत, अनोख्या पद्धतीने सरकार व प्रशासनाचा निषेध देखिल आज करण्यात आला.

दरम्यान यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुख अमर कतारी, पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, संपर्कप्रमुख नरेश माळवे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, शहर संघटक दीपक साळुंखे, शहर कार्याध्यक्ष अजीज मोमीन, विभाग प्रमुख विजय भागवत, संभव लोढा, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उप तालुकाप्रमुख जनाभाऊ नागरे, सागर भागवत, 

मार्केट कमिटी सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, संगीताताई गायकवाड, आशाताई केदारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख योगेश बिचकर, तालुकाप्रमुख सदाशिव हासे, एस. पी. राहणे, सुदर्शन इटप, घुलेवाडी गटप्रमुख रवी गिरी, शाखाप्रमुख नितीन अनाप, उप तालुकाप्रमुख संतोष कुटे, युवा सेनेचे शोएब शेख, विभाग प्रमुख माधव फुलमाळी, मुकेश कचरे, प्रशांत खजुरे, लिंगमूर्ती चिंता भजनी मंडळ, अर्जुन आम्ले, राजेंद्र लोणारी, माधव आवसक, चंदू भागवत तसेच तालुक्यातील वारकरी व टाळकरी याच्यांसह शहर व तालुक्यातून आलेले शिवसैनिक, युवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !