‘भगव्या मोर्चा’चे संगमनेर भाजपकडून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न - अमर कतारी

संगमनेर Live
0
◻️ आ. बाळासाहेब थोरात यांच्या पत्राचा विपर्यास करून ब्लॅकमेल करण्याचं काम 

◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हिंदूंची माफी मागावी, अशी कोणतीही मागणी हिदूंनी केलेली नाही

संगमनेर LIVE | हिंदू महिला, शेतकरी, व्यापारी यांच्या सूरक्षिततेच्या तसेच गो - रक्षणाच्या मुद्द्यावरून संगमनेरात सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट भगवा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्व हिंदूबांधव आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते हे हिंदुत्ववादी म्हणून स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या संगमनेरात जोर्वे नाका परिसरात घडलेली दुर्देवी घटनेमुळे बाधित झालेला युवा वर्गला धीर देणे, ग्रामीण भागातील हिंदूंच्या पाठीशी आम्ही सर्व एकजूटपणे उभे आहे. हे दाखवण्यासाठी सर्वच जण या मोर्चात सहभागी झाले. परंतु ह्या मोर्चाचे श्रेय घेण्यासाठी तसेच राजकीय वळण देण्यासाठी भाजप केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टिका शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अमर कतारी यानी केली आहे.

अमर कतारी यानी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आ. बाळासाहेब थोरात यांच्या पत्राचा विपर्यास करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम काही रिकामी टाळकी करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी असल्यामुळे आ. थोरात यांचे बेरजेचं राजकारण तालुक्यातील सर्वच जण ओळूखून आहे. सर्वसमावेशक धोरण असल्याने राज्यातील इतर ठिकाणासारखं आपल्या मतदारसंघात धार्मिक दंगलीचे वातावरण होऊ नये किंवा तशी घटना घडू नये आणि असे काही घडवू इच्छिणाऱ्या लोकांना ईशारा देण्यासाठी आमदार थोरात यांनी पत्र लिहिले असावे व त्या संदर्भात वक्तव्य केले असण्याची शक्यता कतारी यानी वर्तवत लोकप्रतिनिधीना आपला मतदार संघ शांत व तणाव रहित राहावा असे वाटले तर त्यात वावगे काय? असा सवाल त्यानी उपस्थित केला.

केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेत असतांना देखिल गो - हत्या होत असतील, लव्ह जिहादचे प्रकरण वाढत आसतील, धार्मिक तेढ वाढत असतील तर हे भाजपचे अपयश आहे, कि सत्तेत टिकून राहण्यासाठीचे षडयंत्र? कडवट हिंदुत्वाचा विचार करायचाच झाला तर आणि केवळ मुस्लिम द्वेष करायचा असेल तर भाजपा मध्ये देखिल अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत त्यांच्या बद्दल संगमनेर भाजप ने आपली भूमिका स्पष्ट करावी. जिहाद डोक्यात ठेवणारा मुस्लिम हा नक्कीच हिंदुत्वाचा आणि हिंदुस्थानचा शत्रू आहे मात्र केवळ राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना, हातावर पोट असणाऱ्यांना दंगलीच्या झळा लागू नये असेही माझे वैयक्तिक मत असल्याचे अमर कतारी यांनी म्हटले आहे.

दरम्यान या भगव्या मोर्चाचं आयोजन नियोजन कोणत्याही विशिष्ट संघटनेने अथवा पक्षाने केले नाही. हिंदुत्वादी युवक एकत्र आले त्यांनीच भगवा मोर्चाचे नियोजन केलं व सर्व हिंदू समाजाला त्यांची भूमिका पटली म्हणून हिंदू समाजातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी युवक एकत्र आले. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पत्राला उत्तर देताना भाजपने मागणी केली की त्यांनी हिंदूंची माफी मागावी, कोणत्याही हिंदू ने अशी मागणी केलेली नाही. भाजपने ही मागणी वयक्तिक स्वरुपात राजकीय हेतू ठेवून केली असेल तर भाजपने स्वतःच्या नावाने मागणी करावी. सकल हिंदू समाज व हिंदू युवकांचे नाव घेऊ नये. आम्ही असा कोणताही ठेका संगमनेर भाजपला दिलेला नाही. 

या मोर्चामध्ये येताना आम्ही आमच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते घरातील सदस्य मित्रपरिवार सर्वांना सोबत घेऊन आलो, कारण सदर भगवा मोर्चा हा राजकारण विरहित होता कोणत्याही विशिष्ट समाजाला नाव ठेवण्यासाठी सदर मोर्चा नव्हता. संगमनेर मध्ये गेले अनेक वर्षापासून हिंदू - मुस्लिम एकत्र राहत आहे, भविष्यातही एकत्र राहतील चुकीच्या व गैरवर्तन करणाऱ्या मुस्लिमांचे समर्थन आम्हीही करणार नाही, परंतु जोर्वे नाक्यातील काही मुस्लिम युवकांनी चूक केली असेल तर याचा अर्थ संगमनेर मधील सर्वच मुस्लिम वाईट आहे असं होत नाही म्हणून भाजपने आता भगवा मोर्चाचं राजकारण थांबवावं व संगमनेर मधील हिंदू मुस्लिम बांधवांना शांततेने जगू द्यावे असे आवाहन अमर कतारी राजपूत यानी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !