◻️ रिपाईच्या (आठवले) शिष्टमंडळाचे आश्वी पोलीस ठाणे येथे निवेदन
◻️ आरोपीचा तीव्रं शब्दात व्यक्त केला निषेध
संगमनेर LIVE | नादेंड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरुन अक्षय भालेराव या तरुणाचा खून करण्यात आला होता. या तरुणाच्या मारेकऱ्याना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपाईचे (आठवले) तालुकाध्यक्ष अशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने आश्वी पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन केली आहे.
यावेळी रिपाईने (आठवले) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नादेंड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अक्षय भालेराव या तरुणाने जयंती साजरी केली होती. याचाचं जातीय द्वेष मनात धरुन गावातील काही गावगुंडानी १ जून २०२३ रोजी निर्दयीपणे अक्षयची हत्या केली. यामुळे संपुर्ण आंबेडकरी जनतेमध्ये तीव्रं संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा सीबीआय किवां सीआयडी मार्फत चौकशी करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या आरोपीना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच पिडीत कुटुंबाला राज्य सरकारने ५० लाखाची अर्थिक मदत करावी व कुटुंबातील एका सदंस्याला शासकीय सेवेत सामाऊन घेण्याची मागणी तालुकाध्यक्ष अशिष शेळके यांच्या समवेत गेलेल्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यानी अक्षयच्या मारेकऱ्याचा तीव्रं शब्दात निषेध व्यक्त केला.
दरम्यान या निवेदनावर रिपाईचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके, युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे, उपाध्यक्ष रमेश भोसले, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, सागर शिदें, महिला तालुकाध्यक्ष रुपाली सोनवणे, मीनाताई बिडगर, एकलव्य संघटनेचे संतोष बर्डे, मानव सुरक्षा संघाचे अमोल राखपसरे, रोहित शेळके, आकाश शेळके, शुभम शेळके, सौरभ शेळके, सनी लोढें, ऋतिक शेळके, योगेश कडलग, स्वप्निल कदम, पकज कदम, सुरज कदम, शामराव कदम, गणेश कदम, भारत गायकवाड, रमेश भोसले, केरुनाथ भोसले, जावेद मनियार, सागर शिदें, चेतन डोखे, जय कदम, लक्ष्मण कदम, नानासाहेब कदम, महेश बर्डे, सुरज गोलवड, करन गवळी आदिसह रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.