संगमनेर LIVE | सह्याद्री संस्थेचे डी. के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान ता.संगमनेर येथे योग दिन साजरा झाला असल्याची माहिती प्राचार्य साहेबराव कोल्हे यांनी दिली आहे.
२१ जून जागतिक योगदिनाच्या निमित्ताने विद्यालयात १३५० विद्यार्थ्यानी 21 JUNE YOGA DAY या इंग्रजी अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. आज सर्व जगामध्ये योग दिन साजरा होतो आहे. २१ जून हा दिवस योग दिन आहे याचे औचित्य साधून व योगाचा प्रचार व प्रसार अधिक व्हावा हाच सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला.
ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली. त्यांना प्रा. काकड व सर्व प्राध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. योगशिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी विद्यार्थ्याना योगा प्रात्यक्षिके करून दाखवली.
दरम्यान यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापीका श्रीमती पवार एल. आर. इन्चार्ज ज्यु. कॉलेज, प्रा. बाबा गायकवाड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ शूटिंग विवेक काशीद यांनी केले.