संगमनेर LIVE (शिर्डी) | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शिर्डी संस्थामधील आकृतीबंधातील मंजूर पदांवर नियुक्त असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरवा केला होता. यापुर्वी विधी व न्याय मंत्री असताना १०५२ कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
उर्वरीत कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्तिगत पाठपुरावा करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे विधी व न्याय विभागाने शासन आदेश काढून ४० टक्के वेतनवाढ देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे संस्थानला कळविल्याने सेवेत असलेल्या आकृतीबंधातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या मागणीसाठी कर्मचाऱ्याचा मोठा संघर्ष झाला. परंतू संस्थान समितीने सहानुभूती दाखवून हा निर्णय होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असतील आशी
ग्वाही त्यांनी दिली आहे.