◻️ चित्रपट निर्माते सुभाष घई, अभिनेते जॉकी श्रॉफ व प्रसिद्ध निर्माते महावीर जैन होते उपस्थित
◻️ मोदी @९ विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत चित्रपट महोत्सवाचे आयोजन
◻️ भाजपा चित्रपट नाट्य आघाडी अध्यक्ष संदीप घुगे आहेत संगमनेर तालुक्याचे भुमिपुत्र
संगमनेर LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त देशभरात मोदी @९ विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपा चित्रपट नाट्य आघाडी (मुंबई प्रदेश) आयोजित चित्रपट महोत्सव नुकताचं सुभाष घई यांच्या विसलिंग वूड्स या सभागृहात पार पडला. अशी माहिती महोत्सवाचे आयोजक संदीप घुगे यांनी दिली आहे.
यावेळी आयोजित चित्रपट महोत्सवाला चित्रपट निर्माते सुभाष घई, अभिनेते जॉकी श्रॉफ व प्रसिद्ध निर्माते महावीर जैन हे उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाचे आयोजक भाजपा चित्रपट नाट्य आघाडी अध्यक्ष व संगमनेर तालुक्यातील मांलुजे येथिल रहिवासी तसेच व्यवसायानिमित्त मुंबई येथे स्थायिक असलेले संदीप घुगे, महामंत्री संजय नाडर, विनय नाईक, उपाध्यक्ष जयदीप सेन, हिनल मेहता, सचिव लेसली त्रिपाठी, सोशल मीडिया प्रमुख अदिती घुगे यांनी केले होते.
या महोत्सवात प्रथम पुरस्कार महिला सबलीकरण यावर आधारित चित्रपट ‘पाठ’ याला मिळाले. तर दुसरा पुरस्कार ‘फरक पड़ता है’ या व्हिजलिंग वुड निर्मित लघु चित्रपटला मिळाले. हा चित्रपट पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या विषयावर आधारित आहे. तिसरा पुरस्कार ‘नजर अंदाज’ या विसलिंग वुड्स निर्मिती लघु चित्रपटाला मिळाला.
तसेच उत्तम पुरस्कार अभिनेता अभिलाष थापलियाल, उत्तम अभिनेत्री पुरस्कार ईशा हिला परंपरा या लघु चित्रपटासाठी मिळाले. तसेच उत्तम दिग्दर्शक म्हणून करण सिंग राठोड याला ‘पाठ’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. तर स्पेशल ज्युरी अवॉर्ड गजरा व इवीएस या लघु चित्रपटांना मिळाले. तसेच सुभाष घई यानी महिला सबलीकरण या विषयाला पाठीबां दिल्याबद्दल अभिनेते जॉकी श्रॉफ यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान या चित्रपट महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भाजपा चित्रपट नाट्य आघाडी अध्यक्ष संदीप घुगे व त्याच्यां सहकाऱ्यांचे राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सौ. अमृता फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. अँड. अशिष शेलार, आ. प्रविण दरेकर व अभिनेते प्रशांत दामले यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.