◻️ ना. राधाकृष्ण विखे पाटील याच्यां हस्ते प्रतापपूर गावाला ५ लाखांचा ‘वैकुठं रथ’ दान
◻️ इलग पाटील कुटुंबाने वडिलांच्या स्मरणार्थ राबवलेल्या उपक्रमाचे विखे पाटील यांच्याकडून कौतुक
संगमनेर LlVE | प्रत्येक गोष्ट जर व्यावहारिक नजरेतून पहावयास लागलो तर, सामाजिक व्यवस्था कोलमडून पडेल. वारकरी संप्रदायात मोठी ताकद असल्यामुळेचं लाखो वारकरी हे पंढरपूरला जात असतात. वडिलांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी भगवानराव इलग, सुरेश इलग, प्रा. बाळासाहेब इलग व कुटुंबियांनी गावांसाठी भव्य असा ‘स्वर्ग रथ’ (वैकुंठ रथ) दान देणे हा सुदंर उपक्रम असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले आहे.
सर्वसामान्य व्यक्तीसह गोरं गरीब जनतेला येणारी अडचण लक्षात घेऊन संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथिल भगवानराव इलग व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गावाला पाच लाख रुपये किंमतीचा ‘वैकुंठ रथ’ दान दिला. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. तसेच यावेळी वैकुंठ रथाची चावी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे सुपुर्द करुन रथ बांधणाऱ्या कारागिरांचा ना. विखे पाटील यांच्या हस्तें सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, उध्दव महाराज मंडलिक, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बॅकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेट, मांचीहिल शिक्षण संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर, राजेंद्र पिपाडा, शिवाजीराव इलग आदींसह आश्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कै. निवृत्ती पाटील इलग यांनी रचलेला विचारांचा पाया इतका मजबूत आहे की, त्याला कोणीही हालवू शकणार नाही. त्यांच्याबरोबर विखे पाटील कुटुंबाचा २५ ते ३० वर्ष स्नेह होता. ते अतिशय स्पष्ट वक्ते होते. विखे पाटील कुटुंबावर त्याचे निस्वार्थ प्रेम असल्यामुळेचं आजारी असतानाही मला या कार्यक्रमाला यावे लागले. असे सांगताना कै. निवृत्ती पाटील इलग यांना श्रद्धांजली वाहून त्यानी इलग कुटुंबाने वैकुंठ रथ दान दिल्याबद्दल कौतुक केले. तसेच यावेळी ना. विखे पाटील यांच्या हस्ते दाढ येथिल शाळेला ११ हजारांची देणगी व भजणी मंडळला साहित्याचे देखिल दान देण्यात आले.
दरम्यान यावेळी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी अमृततुल्य किर्तणातून उपस्थिताना वडिलांचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून मोठा जनसमूदाय उपस्थित होता.