जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. निवृत्ती सबाजी पाटील इलग यांचे उद्या प्रथम पुण्यस्मरण
◻ विदर्भरत्न रामायणाचार्य हभंप रामराव महाराज ढोक यांच्या अमृततुल्य किर्तणाची मेजवानी
◻️ हभंप ढोक महाराज व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भव्य ‘वैकूठ रथ’ गावाला दान करण्याचा इलग कुटुंबियांचा मानस
संगमनेर LIVE | पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथिल सच्चे सहकारी असलेले तसेच जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी निवृत्ती सबाजी पाटील इलग (वय - ९१) यांचे मागील वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले होते. आदर्श कुटुंब प्रमुख, आदर्श वडील, तसेच शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात सदैव पुढे असलेले व्यक्तीमत्व गावाने गमावले होते. उद्या गुरुवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विदर्भरत्न रामायणाचार्य हभंप रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तणाची मेजवानी उपस्थिताना अनुभवता येणार असल्याची माहिती इलग कुटुंबियानी दिली आहे.
के. निवृत्ती सबाजी पाटील इलग हे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते. २१ डिसेंबर १९३३ रोजी निवृत्ती पाटील इलग याचां जन्म प्रतापपूर येथिल सबाजी पाटील व लक्ष्मीबाई याच्यां पोटी झाला होता. बालपणीचं स्वातंत्र्य लढ्याकडे ते आकर्षित झाले होते. क्रांतीसिंह नाना पाटील याच्यांकडून प्रेरणा घेऊन खळी (ता. संगमनेर) येथिल शिकारीच्या डोगंरावर ‘जंगल सत्याग्रह’ करत ब्रिटीश सरकार विरुद्ध त्यानी आवाज उठावला असल्याची माहिती जेष्ठ, जुने व जाणते नागरीक देत असतात.
स्वातंत्र्य प्राप्तीनतंर प्रतापपूर गावासाठी त्यानी स्वतःला वाहून घेऊन १९६१ साली सेवा सहकारी सोसायटीची स्थापन केली होती. त्यावेळी उध्दघाटनासाठी सहकार मंत्री एस. के. डे. याच्यांसह पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, बाळासाहेब भारदे, जेष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यानां गावात आणले होते. त्यानी कार्यकर्तुत्वातून गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत, दुध संस्था व पाणी पुरवठा योजना निर्माण केल्या असल्याची माहिती स्थानिकानी दिली आहे.
सहकाराचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, जेष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील, बाळासाहेब भारदे, सखाराम हैबती जोधंळे, पद्मभूषण मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील, जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंढे व राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील याच्यांशी त्याचां वैयक्तिक स्नेह होता. विखे पाटील कुटुंबाचे आश्वी जिल्हापरिषद गटातील एकनिष्ठ सहकारी व जुन्या पिढीतील अतिशय प्रतिष्ठित नागरीक म्हणून ते जिल्ह्यात परिचित होते. नंतरच्या काळात यांनी त्यांनी स्वतःला धार्मिक कार्यात देखिल वाहून घेतले होते.
कै. निवृत्ती सबाजी पाटील इलग यांचे उद्या गुरुवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. प्रथम पुण्यस्मरण असल्याने विदर्भरत्न रामायणाचार्य हभंप रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तणाची मेजवानी उपस्थिताना अनुभवता येणार असून आश्वी - प्रतापूर रस्त्यावरील कौशल्या निवास खंडोबा मंदिराजवळ पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान पंचक्रोशीतील मित्रपरिवार, नागरिकांसह नातेवाईक व आप्तेष्ट यानी या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवनेरी उद्योग समुहाचे संस्थापक व आश्वी परिसराचे जेष्ठ नेते भगवानराव इलग, प्रगतशील शेतकरी सुरेश इलग, प्रा. बाळासाहेब इलग यांच्यासह इलग पाटील कुटुंबियानी केले आहे.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. निवृत्ती सबाजी पाटील इलग यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी इलग कुटुंबिय तब्बल पाच लाख रुपये किंमतीचा ‘वैकुठ रथ’ प्रतापपूर गावाला दान देणार असून या रंथाचे लोकार्पण हभंप रामराव महाराज ढोक व राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचा मानस इलग कुटुंबियांनी बोलुन दाखवला आहे.