💥 सावधान.. चिचंपूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार
◻️ समुदाय आरोग्य अधिकारी सचिन गवारे यांनी केला बिबट्या कॅमेरात कैद
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी तीरावरील गावांमध्ये बिबट्ये दिसण्याची घटना काही नवीन परंतू मंगळवारी रात्री निर्धास्तपणे फिरतानाचा बिबट्याचा सामना समुदाय आरोग्य अधिकारी सचिन गवारे यांना झाल्यामुळे त्यांनी या बिबट्याचा विडीओ कॅमेरात कैद केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोकणगाव प्राथमिक आरोग्य केद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी सचिन राधाकिसन गवारे यांचा मुलगा आजारी असून त्यांच्यावर कोल्हार येथे उपचार सुरु आहेत. मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कोल्हार येथून दाढ बुद्रुक मार्गे चिचंपूर येथे चालले होते.
यावेळी दाढ खुर्द शिवारातील हरणधोडाई परिसरात त्याची गाडी आली असता गाडीच्या प्रखर उजेडात एक पुर्ण वाढ झालेला बिबट्या निर्धास्तपणे वावरताना त्याना दिसला. त्यामुळे त्यानी गाडी थांबवली होती. गाडी उभी असल्याचा कोणताही परिणाम या बिबट्यावर झाला नाही.
तर थोडा वेळ रस्त्यावर थांबून हा बिबट्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात गडप झाला. यांचे पुर्ण चित्रण आपल्या मोबाईलमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी सचिन राधाकिसन गवारे यानी केले आहे.
दरम्यान यांचं परिसरात पुढे लोकवस्ती असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.