◻️पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न
संगमनेर LIVE (तिसगाव) | जिरायती भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असून या करिता सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. राज्य शासन व केंद्र सरकारच्याध्यामातून या भागात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी आपल्या सगळ्यांचा प्रयत्नाची गरज असल्याचे अहमदनगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ते पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, श्रीमती आ. मोनिकाताई राजळे, अभय आव्हाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, अनेक वर्षंपासून या भागाचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या रस्त्याच्या प्रश्ना बाबत काहींनी विनाकारण आंदोलन केली, मात्र या रस्त्यासाठी करावयाचा पाठपुरावा तसेच घ्यावयाच्या मंजुरी तसेच लागणारा निधी हे आणण्याची धमक केवळ आमच्याकडेच असून आ. मोनिकाताई राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी ज्या पद्धतीने याचा पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारक्च्या माध्यमातून आपण निधी मंजूर करून आणला त्या नंतरच हा एवढा चांगला महामार्ग बनला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रेयासाठी अनेकजण वाट पाहूनच असतात मात्र जनतेस सर्व माहिती आहे असे खा. विखे यांनी सांगताना ये पब्लिक हैं ये सब जानती है हा डायलॉग ऐकवला.
या बरोबरच या परिसरातील वांबोरी येथील चारीचा ही प्रश्न अशाच पद्धतीने सोडविला आहे. आमच्याकडे काम करून घेण्याची धमक आहे आणि आमचा हेतू शुद्ध आहे. त्यामुळे आमची कामे हे पटापट होतात, विरोधकांना कुठेही एक तर पैसा आणि दुसरं राजकारण दिसते त्यामुळे त्यांची नजर ही कायम त्यावरच असते असा हल्लाबोल करून या भागातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या मावेजा विषयी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून लवकरच त्यांच्या खात्यावर मावेजा जमा होईल असे आश्वासन यावेळी दिले.
आम्ही या भागात केवळ राजकारण केलं नाही तर या परिसराचा सर्वांगीण विकास साधला आहे. आपण कधी ही राजकीय परिस्थितीचा विचार केला नाही केवळ काम करत राहिलो असे सांगून निवडणुकीची चिंता आपण कधीच केला नाही. ज्या ज्या वेळी आम्हाला विकास कामासाठी उभे राहावे लागले तेव्हा तेव्हा आम्ही सर्वोतोपरी उभे राहिलो, कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. वेळप्रसंगी विकास कामासाठी आम्ही लोकांची नाराजी देखील स्वीकारली असून ही नाराजी आम्ही जनतेसाठी स्वीकारली असे सांगितले.
या भागाचा सर्वांगीण विकास साधताना काही चौकटीच्या बाहेर जावून काम करावे लागले मात्र आम्ही त्याच्या परिणामाचा विचार सुद्धा केला नाही फक्त जनतेचा कसा विकास करता येईल हाच उद्दात हेतू ठेवून काम केले. विरोधक हे केवळ विरोधासाठी सातत्याने आडकाठी आणात असतात मात्र ते सर्व पार करून आम्ही कामे केलीत. जनतेने आजवर आमच्यावर केवळ विश्वास ठेवला आणि आम्ही या विश्वासास पात्र ठरण्याचे काम करतोय. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करावयाचे असून यासाठी आपण कामाला लागले पाहिजे असे आवाहन केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ.मोनिकताई राजळे यांची भाषणे झाली.
या मेळाव्या दरम्यान काशिनाथ लवांडे यांच्यासह समस्त कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मेळाव्याच्या प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने गावात भव्य जंगी स्वागत करण्यात आले. तसेच बाईक रॅली देखील काढण्यात आली.
याप्रसंगी अभय आव्हाड, पांडुरंग फसले महाराज, काशिनाथ लवांडे, रामकृष्ण काकडे, माणिकराव खेडकर, पुरुषोत्तम आठरे, कुशल भापसे, धनंजय दढे, सुभाष बर्डे, चतुदत्त वाघ, अजय रक्ताटे, एकनाथराव आरकर, सुनील परदेशी, वैभव खालाटे, जिजाबापू लोंढे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.