◻️ पालकमंत्री विखे पाटील व विधानसभा सदस्य बच्चु कडु राहणार उपस्थित
◻️ अधिकाधिक दिव्यांग व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (अहमदनगर) | “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे आयोजन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच विधानसभा सदस्य तथा अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निशा लॉन अहमदनगर - पुणे रोड, अहमदनगर येथे १२ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास जिल्हयातील लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन् त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करणार आहेत.
दरम्यान या अभियानास जिल्हयातील अधिकाधिक दिव्यांग, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.