◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचा ७४ वा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम संपन्न
◻️ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार रुपये प्रति टन भाव देणार
संगमनेर LIVE (लोणी) | यावर्षीच्या गळीत हंगामावार ऊसाचे संकट असले तरी मार्ग काढून आपल्याला हंगाम यशस्वी करायचा आहे. उपलब्ध पाण्यावर कार्यक्षेत्रात ऊस लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवावे लागणार असल्याने सामुहीक प्रयत्नातून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कटीबध्द व्हावे असे आवाहन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७४ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक सर्वश्री दादासाहेब चंद्रभान घोगरे आणि सौ. विजया दादासाहेब घोगरे, धनंजय बाबासाहेब दळे आणि गोपिका धनंजय दळे, अण्णासाहेब मुरलीधर म्हस्के आणि सौ. अंजली आण्णासाहेब म्हस्के, बापूसाहेब दादा वडितके आणि सौ. चंद्रभागा बापूसाहेब वडितके, संजय कारभारी गाडेकर, दत्तात्रय साहेबराव खर्डे आणि सौ. सविता संजय गाडेकर यांच्या शुभहस्ते विधीवत पुजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीषराव ससाणे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, ट्रक सोसायटी अध्यक्ष नंदूशेठ राठी, भाजीपाला सोसायटीचे अध्यक्षा गिताताई थेटे, कार्यकारी संचालक अनिल पाटील कारखान्याचे सल्लागार जिमी सर्व संचालक कामगार शेतकरी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, यावर्षाचा हंगाम यशस्वी करतांना सर्वानी एकत्रित प्रयत्न महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या कारखान्याने यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव तीन हजार रुपये प्रति टन भाव देणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर उस लागवड करावी. कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन झाले तर त्याचा फायदा सर्वाना होतो.
विजया दशमीच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना महिलांचा सन्मान करण्याचा संदेश देणारा हा उत्सव असून दृष्ट प्रवृतीचा वध दसर्याला केला जातो. गुरुवारी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे गावपातळीवर सर्वाना कार्यक्रमाला घेवून येण्याचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष सतीष ससाणे यांनी मानले.