◻️ संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले व त्याच्यां पत्नी अश्विनीताई बिरोले यांच्या हस्तें होणार पुजा
◻️ कारखाना कार्यस्थळावर बॉयलर पुजन कार्यक्रमाची जयत तयारी सुरू
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल श्री गजानन महाराज शुगर लि. या साखर कारखाण्याचा गुरुवार दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावरील भक्तनगर याठिकाणी सन २०२३-२४ च्या गळीत हंगामाचा ७ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले व त्याच्यां पत्नी अश्विनीताई बिरोले यांच्या हस्तें संपन्न होणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील सहा गळीत हंगाम कारखाण्याने यशस्वी पुर्ण करुन यंदा सातव्या गळीत हंगामाची तयारी पुर्ण केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याना मालाचा योग्य मोबदला मिळत असल्याने ऊस उत्पादक, ठेकेदार, पुरवठादार, अधिकारी व कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. उद्या गुरुवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १२.३० वा कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले व त्याच्यां पत्नी अश्विनीताई बिरोले यांच्या हस्तें ७ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विधिवत संपन्न होणार आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी ९ वा. श्री. गजानन महाराज मंदिरात श्रीची पुजा व आरती होणार असून १० वा. श्रीच्या पादुकांची पालखीतुन मिरवणूक काढली जाणार आहे. यानंतर बॉयलर पुजन व त्यानंतर स्नेह भोजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी सभासद, ऊस उत्पादक व कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक शंतनु बिरोले, ईशाताई शंतनु बिरोले, नंदन बिरोले, अँड. रामदास शेजुळ, हरिभाऊ गिते, सुभाष कोळसे, केरुबापू मगर, बी. एन. पवार यानी केले आहे.