व्यंगचित्रकार गाडेकर यांनी नवरात्र उत्सव काळात साकारल्या नऊ दिवस नऊ दुर्गा
◻️ महान, कर्तृत्ववान आणि सामाजिक काम करणाऱ्या महिलाचे रेखाचित्र रेखाटले
संगमनेर LIVE | नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक सेवाभावी संस्था आणि मंडळांनी अनेक उपक्रम राबविले. संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी वेगळा उपक्रम राबवत नऊ दिवस आपल्या कुंचल्यातून नऊ दुर्गा साकारल्या आहेत.
यामध्ये गाडेकर यांनी भारतातील महान व कर्तृत्ववान आणि सामाजिक काम करणाऱ्या महिला होऊन गेल्या आहेत त्यांचे रेखाचित्र हे अंक, आकार आणि रेषांमधून काढले. त्यांनी जिजाबाई शहाजी भोसले, महाराणी अहिल्या देवी होळकर, झाशीची राणी, सावित्रीबाई जोतिबा फुले, रमाबाई भीमराव आंबेडकर, डॉ. आनंदीबाई जोशी, मदर तेरेसा, लता मंगेशकर या दुर्गा साकारल्या आहेत.
या माध्यमातून या थोर व्यक्तिमत्वांविषयी सखोल माहिती अनेकांना मिळाली. या उपक्रमास समाजातील सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून यावेळी त्यांच्या या उपक्रमास संगमनेरच्या सुप्रिया अमोल गवांदे (स्टेट बँक), दुर्गाताई तांबे (मा. नगराध्यक्ष संगमनेर नगरपालिका ), स्मिता गुणे (मुक्त पत्रकार आणि सूत्रसंचालिका), अँड. रंजना पगार - गवांदे (राज्य सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती), सौ. सुशीला किसन हासे (संपादक दैनिक युवावार्ता) डॉ. अर्चना अशोक सोनांबेकर (प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ ), उत्कर्षा रुपवते (महासचिव, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, सदस्य- महाराष्ट्र महिला आयोग) संज्योत वैद्य (संचालिका स्ट्राबेरी इंग्लिश मेडीयम स्कुल संगमनेर), प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ ज्योती प्रदीप मालपाणी यांनी या उपक्रमास सोशलमीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. समाजप्रबोधनाचे हे माध्यम सोशलमीडियावर लोकप्रिय ठरले आहे.
अरविंद गाडेकर यांनी सुंदर चित्रे रेखाटली आहेत आणि या व्हिडीओ क्लिप मध्ये या व्यक्तिमत्वांविषयी माहिती सांगण्यासाठी वाचन स्वर अनिल सोमणी यांनी दिला आहे. व्हिडीओ चित्रीकरण एडिटिंग शानू बेगमपुरे यांनी. तसेच याकामी अमोल गवांदे, अनिल देशपांडे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. अरविंद गाडेकर यांनी स्तुत्य उपक्रम राबविला याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.