आश्वी खुर्द ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी तिरंगी लढत

संगमनेर Live
0
◻️ सदंस्य पदाच्या ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात 

◻️ अपक्ष उमेदवार विखे पाटील गटांची डोकेदुखी वाढवणार 

संगमनेर LlVE | शिर्डी मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील अतिशय प्रतिषठेच्या अशा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने - सामने उभे ठाकले असून अटीतटीच्या दुरंगी लढतीतबरोबरचं अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

याठिकाणी लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून सौ. अलका बापूसाहेब गायकवाड तर थोरात गटाकडून सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे या रिंगणात उतरले असून सौ. सोनाली मोहित गायकवाड या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक रंगतदार व अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी १० उमेदवारी अर्ज तर सदंस्य पदाच्या ११ जागासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. असे असले तरी आज २५ ऑक्टोबरला म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्तां ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागयात असल्याने थोरात गटही सत्तां आपल्याकडे खेचण्यासाठी एकास एक उमेदवार मैदानात उतरवले आहे. 

ग्रामपंचायत निवडणूकीत सदंस्य पदासाठी प्रभागनिहाय अंतिम उमेदवार पुढीलप्रमाणे..

प्रभाग १ :- सुवर्णा राजेंद्र सातपुते, (विखे गट), कल्पना सचिन क्षिरसागर (विखे गट) तसेच  रुपाली सुनील क्षिरसागर (थोरात गट), प्रतिक्षा मिलिंद जाधव(थोरात गट), 

प्रभाग २ :- सागर दिनकर भडकवाड (विखे गट), विठ्ठल बजाबा गायकवाड (विखे गट), गुलनाज कमाल सय्यद (विखे गट) तसेच भारत छब्बु भडकवाड (थोरात गट), इन्नुस छन्नुमियाॅ सय्यद (थोरात गट), नानुबाई तात्या माळी (थोरात गट). याव्यतिरिक्त मोहित गंगाधर गायकवाड (अपक्ष), संतोष भास्कर भडकवाड (अपक्ष) उमेदवारी करणार आहेत.

प्रभाग ३ :- जनाबाई देवराव शिंदे (विखे गट), सौ. आशा बंडु मुन्तोडे (विखे गट), दत्तात्रय सोन्याबापू मांढरे (विखे गट), तसेच संजय गबाजी भोसले (थोरात गट), पुनम राजेंद्र गायकवाड (थोरात गट), योगिता संजय शिरतार(थोरात गट), याव्यतिरिक्त लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर (अपक्ष) हे निवडणूक लढवणार आहेत.

प्रभाग ४ :- बाबासाहेब प्रताप भवर (विखे गट), सोपान मधुकर सोनवणे, (विखे गट), संगिता दत्तात्रय बर्डे (विखे गट), तसेच देवराम पांडुरंग गायकवाड (थोरात गट), संकेत गोकुळ गपले (थोरात गट), प्रमिला संतोष बर्डे (थोरात गट) याव्यतिरिक्त लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर (अपक्ष) व सतिष निवृत्ती गायकवाड (अपक्ष) हे निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुकीत आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे ३ हजार ३११ इतके मतदान आहे. या निवडणुकीत सदस्य पदासाठी २७ तर सरपंच पदासाठी ३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याचे आज २५ ऑक्टोबंर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. 

त्यामुळे आता ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहिर केला जाणार आहे. त्यामुळे पुढील १० दिवस कार्यकर्ते व उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचार करण्याबरोबरच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणार आहेत. 

असे असले तरी अपक्ष उमेदवार मात्र विखे पाटील गटांची डोकेदुखी वाढवण्याची चिन्ह असल्याने जेष्ठ नेते यावर काय उपाययोजना करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ. अलका बापुसाहेब गायकवाड (विखे गट), सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे (थोरात गट) व सौ. सोनाली मोहित गायकवाड (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !