संगमनेर LlVE (पारनेर) | विखे पाटील कुटुंबाने नेहमीच वारकरी संप्रदायाचा विचार घेवून वाटचाल केली. निवडणुकी पुरते राजकारण, नंतर मात्र फक्त समाजकारण हा वारसा जोपासत चौथी पिढी जनसेवेचे काम अविरतपणे करत आहे. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने करीत असलेल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन जि. प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर जि. प. सदस्य काशिनाथ दाते, राहुल पाटील शिंदे, बंडूशेठ रोहोकले, दत्तानाना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामस्थांशी संवाद साधताना सौ. विखे म्हणाल्यां की, गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असून जेव्हा गाव एकत्र येते तेव्हा त्या गावाचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मात्र आपण वैयक्तिक आकसापोटी बऱ्याचदा गावाचे मोठे नुकसान करतो. हे थांबले पाहिजे असे सांगून निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला प्रत्येक शब्द पाळला असून त्या शब्द पूर्तीसाठी आज आपण इथे आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संत श्रेष्ठ श्री साई बाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा मूलमंत्र आपण सर्वांनी पाळला तर आपल्या भागाचा विकास हा शंभर टक्के होईल, आता एक वर्षा पूर्वी राज्यात महायुतीचे सरकार आले, या एक वर्षात राज्य सरकारने घेतलेले निर्णय आपण पाहत असाल,परंतू मागील अडीच वर्षाचा अनुशेष हा भरून काढण्याचा प्रयत्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. सर्वसामान्यांसाठी हे दोघेही अहोरात्र काम करतात त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच यात काही शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
विकास कामे करताना कुठलाही भेदभाव आम्ही करत नाहीत, गाव गाडा चालविण्यासाठी सर्वांच्या मदतीची आवश्यकता असते त्यातूनच गावाचा आराखडा चांगला होऊ शकतो. हा आराखडा तयार झाल्यावर गाव विकासासाठी योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणाणी करता येते असल्याचे सांगतानाच, महिलांनी पुढे येवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्वयं रोजगार सुरू करावा यासाठी लागणारे प्रशिक्षण हे आम्ही देवू. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महिला सक्षीकरणासाठी आता ३३ टक्के आरक्षण लागू केल्याने मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येणाऱ्या काळात आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या भावी पिढीच्या कल्याणासाठी नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन शालिनीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटी केले.
याप्रसंगी पोखरी मध्ये दोन कोटी चोवीस लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा, खडकवाडी येथे ६१६.८५ लक्ष रुपयांच्या तर वडनेर येथे ७५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान यावेळी या विविध कार्यक्रमात शिवाजी काका खिल्लारे, युवराज पठारे, किरण शेठ कोकाटे, ऋषी गंधाडे, गंगाराम रोकले, सरपंच हिराबाई पवार, सिताराम केदार, शिवम पवार, संतोष शेलार, सतीश पवार, अशोक खैरे, ज्ञानदेव पवार यांच्यासह भाजप महायुतीचे जेष्ठ नेते, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.