तालुक्यातील प्रत्येक गावात अनेक विकास कामे- आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
◻️कोळवाडे येथे नळ योजनेचे उद्घाटन व रस्त्याच्या कामाची भूमिपूजन

◻️कोळवाडे आश्रम शाळेमुळे अनेकांच्या जीवनात मोठे बदल

संगमनेर LIVE | कोळवाडे परिसरात सातत्याने रस्ते व विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. नव्याने होणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे पुढील अनेक वर्षांची चांगली सुविधा होणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात अनेक विकास कामे राबवली जात असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले

कोळवाडे येथील नळ योजनेचे उद्घाटन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते यावेळी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, मिलिंद कानवडे, कैलास पानसरे, विष्णू रहाटळ, काशिनाथ गोंदे, दशरथ वर्पे, संजय वामन, बाळासाहेब राहणे, भाऊसाहेब नवले, तुषार गुंजाळ, मंगेश वर्पे, दादासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, अमोल वाकचौरे, सरपंच सौ. पुष्पा गुंजाळ, उपसरपंच बाबुराव गोंदे, सोपान वर्पे आदींचे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. थोरात पुढे म्हणाले की, कोळवाडे गावातील आश्रम शाळा मधील विद्यार्थी आज मोठ्या शासकीय पदापर्यंत मजल मारता म्हणून आज कोळवाडे गावाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. ही गोष्ट भूषणावह आहे. या गावांमध्ये अनेक विकास कामे झाली असून गावातील आदिवासी व सर्व घटकातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले आहे. या गावाने कायम आपल्याला भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात व राज्यात भाजपाचे सरकार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भूलथापा देऊन ते युवकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत भाजपाच्या या फसवेगिरी पासून तरुणांनी सावध राहून राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले

मा. आमदार डॉ तांबे म्हणाले, कोळवाडे गावाचे विकास कामांसाठी आमदार थोरात यांच्या माध्यमातून खूप काम झाले आहे. आदिवासी बहुजन समाजातील आपण लोक आहोत. आजच्या काळातील राजकारण म्हणजे सामान्य माणसाकडे लक्ष न देणे असे आहे. मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे .आपल्याच पैशावर देशाचे उदरभरण चालते. आज आपल्या पैशावर उद्योगपतींची कामे चालतात. महागाई, बेरोजगारी, भाव वाढ यावर चर्चा न होण्यासाठी धार्मिक राजकारणाकडे लक्ष वेधण्याचे काम होत आहे. व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला वाईट मार्गाला घेऊन जाण्याचे काम होत आहे लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचे काम हे सरकार करत आहे.

दशरंथ वर्पे म्हणाले की, कोळवाडे गावाने कायम आ. थोरात साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले आहे. साहेबांनी या गावासाठी अनेक विकास कामे केली आहेत. येथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमदार थोरात यांनी कायम प्रयत्न केले आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आ थोरात यांच्या माध्यमातून मिटला आहे. रस्त्याचे कामही होत आहे. या गावासाठी अनेक शासकीय योजना लाभ गोरगरीब लोकांना मिळाला आहे .

यावेळी सौ. वनिता साबळे, मंगल कुदळ, पोपट कडू, श्रीपत कुदळ, मधुकर गोंदे, बबन घोडे, दत्तात्रय तारडे, मंगेश वरपे, योगेश गुंजाळ, गोरख कुदळ, विलास गुंजाळ आदीं उपस्थित होते

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बाबळे व आभार कैलास गुंजाळ यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निळवंडे च्या कालव्यांमुळे परिसराला फायदा..

निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून डावा कालवा पूर्ण झाला असून उजव्या कालव्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. उजव्या कालव्यामुळे कोळवाडे व परिसरात मोठी समृद्धी येणार असल्याचे मिलिंद कानवडे यांनी म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !