वाकडी येथे 'भरडधान्य - महत्त्व आणि उपयोग' कार्यक्रम

संगमनेर Live
0
◻️ सन २०२२-२३ हे भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर झाल्यामुळे प्रवरेच्या कृषि महाविद्यालयांचा उपक्रम

संगमनेर LIVE (लोणी) | सन २०२२-२३ हे वर्ष इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स अर्थात भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याच अनुषंगाने लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या गायत्री लबडे, प्रांजल बांगर, संजीवनी पावरा, अमृता बिक्कड, पल्लवी शिंदे, मानसी कांबळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकडी यांच्या मदतीने वाकडी येथे 'भरडधान्य - महत्त्व आणि उपयोग' कार्यक्रम आयोजित केला होता. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून फोरमी फुड्स, नाशिकचे कार्यकारी संचालक शशिकांत बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती बच्छाव तसेच गावातील महिला बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, कृषी महाविद्यालय, लोणी येथील डॉ. रमेश जाधव, डॉ. दिपाली तांबे, प्रा. अमोल खडके आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भरडधान्य म्हणजेच पौष्टिक तृणधान्य आहेत. त्यांचा आपल्या शरीराला होणारा फायदा व महत्त्व शशिकांत बोडके यांनी पटवून दिले. भरड धान्याचे प्रकार जसे, बाजरी, ज्वारी, नागली, नाचणी, भगर, वरई, राळा, सामा, सावा, कोदरा, राजगिरा यांतील फरक आणि माहिती दिली. पौष्टिक तृणधान्य आजारांना आपल्यापासून दूर कसे ठेवतात हेही त्यांनी  विषद केले.

दरम्यान या तृणधान्य पासून बनणारे विविध पदार्थ जसे की ज्वारीची बाकरवडी, राळा शंकरपाळी, ज्वारीची पाणीपुरी असे अनेक पदार्थ विक्रीसाठी आणले होते. त्यांनी आपल्या रोजच्या जेवणात एक वेळ तरी भरड धान्य खाण्याचा एक मोलाचा संदेश दिला.

कृषी महाविद्यालयातील डॉ. रमेश जाधव यांनी शेती निगडित व्यवसाय बद्दल मार्गदर्शन केले तसेच डॉ. दिपाली तांबे यांनी फळ आणि दूध प्रकिया बद्दल माहिती दिली. प्रा. अमोल खडके यांनी भरडधान्य वर्षाबद्दल सर्वांना माहिती दिली.

डॉ. स्वाती बच्छाव यांनी आहार, आरोग्य आणि आरोग्य तपासणी बद्दल सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी सलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !