आश्वी खुर्द ग्रामपंचायतीत ‛ कौन बनेगा उपसरपंच ? ’ २३ नोंव्हेबरला निवड !
◻ नूतन सदंस्या कडून जेष्ठ नेत्याची मनधरणी तर गाव गप्पा व चर्चेला उधान
◻️नुतन उपसरपंच नावाबाबत स्थानिक नेत्यांकडून कमालीची गुप्तता ; मातब्बरामध्ये रस्सीखेच
संगमनेर LIVE | शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात जागरुक असलेल्या आश्वी खुर्द गावची ग्रामपंचायत निवडणूक याच महिन्यात पार पडली असून आता गावाला उपसरपंच पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता लागली असल्याने गाव गप्पान मध्ये ‛ कोन बनेगा उपसरपंच ' या चर्चेला उधान येऊन यामध्ये गाव ढवळून निघाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यां गटाने दुसऱ्यादा जनतेतुन थेट सरपंच पदासहा १२ सदंस्या पैकी ११ सदंस्य पदाच्या जागा निवडून आणत विरोधी गटाच्या उमेदवाराचे पाणीपत केले होते. तर विरोधी गटाला मात्रं १ जागेवरचं समाधान मानावे लागले आहे.
नुतन प्रथम महीला लोकनियुक्त सरपंच सौ. अलका बापुसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदंस्याची पहिली मासिक बैठक गुरुवार २३ नोंहेबंर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. या बैठकीत नुतन उपसरपंच निवड होणार असल्याने या पदावर कोणाची निवड होणार व गावचा नुतन उप सरपंच कोण होणार या विषयी स्थानिक नेत्यानी कमालीची गुप्तता पाळल्याने नांगरिकांमध्ये आता वेगळ्याच चर्चेला उधान आल्याचे दिसत आहे. तर दूसरीकडे उपसरपंच पदावर आपलीचं लॉटरी लागावी यासाठी निवडून आलेल्या सदंस्याकडून स्थानिक नेत्याची मनधरणी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
आश्वी खुर्दच्या स्थानिक राजकारणात पदांचा व आडनांवाचा समतोलपणा राखण्याची पंरपरां पुर्वीपासुन आहे. तर यावेळी हे पद सर्वसाधारण महीला उमेदवाराच्या वाट्याला आल्याने प्रथेनुसार गावात ३५ टक्के लोकसंख्या असलेल्या गायकवाड आडनावासं अपेक्षे प्रमाणे सरपंचपद मिळुन सौ. अलका बापुसाहेब गायकवाड सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे उपसरपंच पदासाठी इतरानमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपसरपंच पदासाठी प्रभाग ४ मधुन निवडुन आलेले सोपान सोनवणे व बाबा भवर हे या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी यात कोण बाजी मारतो हे सांगणे कठीण आहे. कारण नामदार विखे पाटील याच्यां विविध संस्थामधील विविध पदे हि आश्वी खुर्द गावाला आहेत.
ग्रामपंयायतच्या इतिहासात भवर आडनाव असलेल्या व्यक्तीकडे उपसरपंच पद एकदाही आले नसल्याने बाबा भवर याच्यां नावावर शिकामोर्तब होऊ शकते. सोपान सोनवणे यानी उपसरपंच पदासाठी दावा ठोकल्यास मात्रं स्थानिक नेत्यानपुढे मोठा पेच निर्माण झाल्यास दोंघानाही अडीच-अडीच वर्ष उप सरपंच पद बहाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र या निवडणुकीत वार्ड क्रमांक २ मधुन निवडुन आलेले संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप सभापती व आश्वी खुर्द सेवा सोसायटीचे संचालक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव गायकवाड यांना १२ वर्ष ग्रामपंचायत सदंस्य पदाचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे अनुभव व जेष्टतेने उपसरपंच पद जाऊ शकते.
दरम्यान १२ जणांच्या ग्रामपंचायत कमेंटीत महीलाना ५० टक्के आरक्षण असल्याने ६ महिला या सदंस्य पदासाठी निवडून आल्या आहेत. सरपंच पद महीलाला असल्याने व सदंस्यातील गटबाजी रोखण्यासाठी उप सरपंच पद महिलेला देण्याची मागणी झाल्यास प्रभाग १ मधुन निवडून आलेल्या व उच्चशिक्षीत असलेल्या सौ. कल्पना सचिन क्षिरसागर व सौ. सुवर्णा राजेंद्र सातपुते यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नुतन सरपंच सौ. आलका गायकवाड प्रभाग २ मधील असुन या प्रभागात गावचा फक्त ४० टक्के भाग ऐत असल्याने व प्रभाग १, २, ३, ४ चा भाग गावठानात येत असल्याने पदांचा व कांमाचा समतोल ठेवायचा असल्यास उपसरपंच पदासाठी प्रभाग ३ मधील सौ. जनाबाई देवराम शिंदे व सौ. आशा बंडु मुन्तोडे याही उपसरपंच स्पर्धत सहभागी झाल्या आहेत. स्पर्धकांची संख्या दिवसे - दिवस वाढत असल्याने उप सरपंच पदाची माळ श्रेष्ठी कोणाच्या गळयात टाकणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असुन अंतिम निर्णय २३ नोंहेबरलाचं लागणार आहे.
उपसरपचं पदावर जर निवडूण आलेल्या प्रत्येक सदंस्याने दावा ठोकल्यास या सर्वाचा मध्यम मार्ग म्हणून राज्य मंत्रीमंडळात जसे दोन उपमुख्यमंत्री आहे त्याच पध्दतीने दोन उपसरपंच करा आशीही चर्चा सुरु झाली आहे. तर नाराजी टाळण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या जनसेवा कार्यालयातुन कदाचित उप सरपंच पदाचे नाव बंद पाकिटातुनही येऊ शकते. अशी माहिती गावातील राजकारणाची माहिती असलेल्या एका जाणकार व्यक्तीने दिली आहे.