दाढ खुर्द येथे सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते दिवाळी निमित्त ५ किलो मोफत साखर
◻️ ग्रामस्थांनी मानले विखे पाटील कुटुंबाचे आभार
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते दिवाळी निमित्त प्रत्येक रेशनकार्ड धारकांना ५ किलो मोफत साखर तसेच दिपावली निमित्त "आनंदाचा शिधा" वाटप करण्यात आला आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक हभप शांताराम महाराज जोरी होते. यावेळी प्रास्ताविक करताना जोरी यांनी विकासकामांबाबत माहिती देऊन विखे पाटील कुटुंबाचे आभार मानले आहेत. याप्रसंगी सौ. विखे यांचा दाढ खुर्द ग्रामपंचायत वतीने सरपंच सतिश कुंडलिक जोशी यांच्यासह गावातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रवरा फळे भाजीपाला संस्थेचे संचालक आण्णासाहेब गेणुजी जोशी, सोसायटीचे चेअरमन मनोहर जोशी, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन भास्कर जोरी, प्रा. सुधिर जोशी, अशोक जोशी, संजय जोशी, शरद कहार, ज्ञानेश्वर वाडगे, बाबासाहेब वाडगे, भिमराज बुधे, सुनिल जोशी, डॉ. साईनाथ जोशी, संदिप जोरी, ज्ञानेश्वर जोरी, भागवत जोरी, रमेश जोशी, आप्पा जोशी, कारभारी जोशी, भास्कर वाडगे, बाळासाहेब जोरी, रावसाहेब जमधडे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सुधिर जोशी यांनी केले. तर डॉ. साईनाथ जोशी यांनी आभार मानले आहेत.