शिबलापूर येथे वीजेच्या धक्क्याने दुभत्या गायीचा मृत्यू
◻️ ज्ञानेश्वर रक्टे यांचे अंदाजे १ लाख ६० रुपये नुकसान
◻️ मंगळवार सकाळची घटना ; परिसरात हळहळ
संगमनेर LlVE | नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वर रक्टे हे गुरे चारण्यासाठी जात होते. यावेळी महावितरणच्या तुटलेल्या वीज वाहक तारेच्या धक्का बसून शिबलापूर (ता. संगमनेर) येथे त्यांच्या दुभत्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर रक्टे हे आपली जनावरे चारण्यासाठी शिबलापूर - संगमनेर रस्त्यावरुन घेऊन चालले होते. यावेळी हॉटेल पाहुणचार समोर तसेच संगमनेर कारखान्याच्या शेतकी गट कार्यालया नजीक एक वीज वाहक तार तुटून पडलेली होती. याठिकाणी गायी येतांच तिला जोरदार वीजेचा धक्का बसला व दुभती गाय जागेवर कोसळत गतप्राण झाली. यामुळे रक्टे यांचे अंदाजे १ लाख ६० रुपये नुकसान झाले असून त्यांना आता मोठ्या अर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रमोद बोंद्रे, दिलखुश शेख, राजेंद्र नांगरे, नवनाथ नांगरे, गजानन बोंद्रे, योगेश नांगरे, महेश रक्टे, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाला याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी कामगार तलाठी सुमित जाधव, ग्रामसेवक सुरेंद्र ब्राम्हणे, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. एम. तांबे, वायरमन कैलास कुदळ, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश मुन्तोडे यांनी येऊन या घटनेचा पंचनामा केला आहे.
दरम्यान याप्रसंगी ज्ञानदेव नांगरे, सुभाष मुन्तोडे, बबन म्हस्के, राजु रक्टे, आण्णा रक्टे, राजेश उदावंत, राजेंद्र बोंद्रे, सागर मुन्तोडे आदि नागरीक उपस्थित होते.