राहाता तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
◻️राज्यघटना आणि लोकशाही मानणारा काँग्रेस पक्ष - बाळासाहेब थोरात
◻️पक्ष सोडून गेलेले काँग्रेसमध्ये येण्यासाठी पुन्हा धडपड करतील!
संगमनेर LlVE | देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, विनायकराव मते, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, मुन्ना फिटर, अमोल आरने, अमोल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी निलेश यादव, रामदास गिधाड, नवनाथ गिधाड, सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल गिधाड, महेश जाधव, अक्षय गोरडे, शुभम बनसोडे, अविनाश उफाडे, प्रज्वल आदमाने, आरपीआयचे राहता उपाध्यक्ष अमोल कोळगे आदींसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना मा. प्रदेशाध्यक्ष आमदार थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. राज्यघटना आणि लोकशाही मानणारा काँग्रेस पक्ष असून या पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे.
काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या नावावर राजकारण करत असतो तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष जाती धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत. हे लोकशाहीला मान्य नाही. आगामी काळात काँग्रेसची सत्ता येणार असून पुन्हा पक्ष सोडून गेलेले काँग्रेसमध्ये येण्यासाठी धडपड करतील.
संगमनेर तालुक्यात अत्यंत समाधानाचे शांततेचे वातावरण आहे. सर्वांना सोबत घेऊन राजकारण होते. शांतता व समृद्धी आहे. बाजारपेठ भरलेली आहे. याउलट तिकडे धाक दडपशाहीचे व दहशतीचे वातावरण आहे. या दहशती विरुद्ध आता जनता आवाज उठवत आहे.
काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा असून आगामी काळात सर्वांना मोठी संधी आहे. अत्यंत मोठी व समृद्ध परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे आपण कार्यकर्ते झालो आहोत याचा अभिमान बाळगा असे ही आ. थोरात म्हणाले.
यावेळी विविध तरुण कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. लोंढे यांनी केले तर सचिन चौगुले यांनी आभार मानले.