खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला.. अहमदनगरचा विकाससेतू!

संगमनेर Live
0
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला.. अहमदनगरचा विकाससेतू!

◻️ उड्डाणपुलाच्या स्तंभांवर साकारली शिवसृष्टी

◻️ खा. डॉ. विखे यांच्या कार्य तत्परते मुळे तब्बल ११० दिवस आधीच काम झाले पूर्ण 


◻️ नगरकरांचा प्रवास सुसह्य करणाऱ्या या उड्डाणपूलाच्या निर्मितीचा खडतर प्रवास

कोणत्याही प्रदेशाचा, शहराचा विकास हा त्या भागातील दळणवळणाच्या साधनांवर अवलंबून असतो. यामध्ये शहराला जोडणारे रस्ते, हवाई व जल मार्ग याबरोबरच शहरांतर्गत प्रवासासाठी उपलब्ध साधनांचीही महत्त्वाची भूमिका असते. अहमदनगर हे औरंगाबाद -पुणे, बीड-पुणे या मार्गावर महत्त्वाचे आणि झपाट्याने विस्तारणारे शहर आहे. शहराचा होणारा विस्तार, पुण्याकडे जाणारी वाहतूक यामुळे वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न बिकट बनला होता. ही कोंडी फोडण्याचे काम खा. सुजय विखे पाटील यांनी शहरांतर्गत तब्बल ३.०८ किलोमीटरचा उड्डाणपूल उभारुन केले. गत दहा ते बारा वर्षात तीन वेळा भूमिपुजन होऊनही पूर्ण होऊ न शकलेला हा उड्डाणपूल पूर्ण करुन खा. विखे पाटील यांनी जणू अहमदनगरचा विकाससेतूच उभारलाय!

वेगाने विस्तार होणाऱ्या आणि विकासपथावर गतीमान असलेले शहर म्हणून अहमदनगरची ओळख बनत आहे. येथील वाहतूकीच्या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी गत पंधरा वर्षांपासून प्रयत्न सुरु होते, परंतु त्यात यश काही मिळत नव्हते. उड्डाणपूलासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो लष्कराकडील जमीन हस्तांतरणाचा, याबरोबरच खासगी जमीन मालकांच्या संमतीपत्रांचा हे अवघड काम करण्यासाठी तेव्हढेच सक्षम नेतृत्व असणे गरजेचे होते. हे अवघड काम खा. सुजय विखे पाटील यांनी लिलया पार पाडले. आता अहमदनगरकरांचा प्रवास सुसह्य करणाऱ्या या उड्डाणपूलाच्या निर्मितीचा प्रवास मात्र खडतरच होता!

अहमदनगर शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना विचाराधीन असतांना एनएचएआय (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) ने सन २०१७ प्रस्ताव सादर केला. परंतु तो योग्य स्वरूपात नव्हता. लष्कराची जमीन हस्तांतरण होत नसल्यामुळें एनएचएआयने वर्क ऑर्डर देण्यास असमर्थता दर्शवली होती. खाजगी जमीन, शासकीय जमीन यांचे सुद्धा जमीन अधिग्रहण बाकी होते. अस्तित्वात असलेल्या पुणे -नगर रस्त्याची जमीन फक्त ताब्यात होती. 

सरंक्षण खात्याची जमीन मिळाल्या शिवाय व ९५ टक्के जमीन ताब्यात असल्याशिवाय बांधकाम परवानगी देणार नाही अशी एनएचएआयची भूमिका होती. लष्कराच्या ताब्यातील जमीन मिळवण्यासाठी नेमका कोणत्या दिशेने पाठपुरावा करायचा यासाठी आदरणीय कै. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी नवीन आरटीओ कार्यालयासाठी मिळवून दिलेल्या डिफेन्सच्या जमिनीच्या केसचा अभ्यास खा. सुजय विखे पाटील यांनी केला. त्यावेळेस आदरणीय कै. डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रात लष्कराच्या स्थायी समितीचे चेअरमन होते व ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील हेराज्यात परिवहनमंत्री होते. 

खा.विखे पाटील यांनी संरक्षण खात्याच्या जमीन मिळवण्यासाठीच्या प्रक्रिया माहिती घेऊन त्या प्रक्रियेविषयी पुण्याच्या संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून खातरजमा करून घेतली व त्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेला त्या प्रमाणे कागदपत्र जोडून प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. नियमानुसार अहमदनगर महानगरपालिकेने संरक्षण जमीन हस्तांतरणासाठी अर्ज करावायास पाहिजे.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूचना केल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेने नोव्हेंबर २०२० मध्ये संरक्षण मंत्रालयाकडे जमीन हस्तांतरणासाठी अर्ज केला. अर्ज तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी डिसेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र शासना कडे संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यासाठी शिफारस केली. 

यादरम्यान कोरोना संसर्गाचा काळ असतांनाही खा. विखे पाटील यांनी पाठपुरावा सुरु ठेवला व तशाही स्थितीत ५ जुलै २०२० ला जमीन हस्तांतरणाचे आदेश निघाले. याबरोबरच खासगी जमीन धारकांची बैठक घेवून त्यांची संमतीपत्रे मिळवण्यासाठी महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त डॉ. भालसिंग यांच्या माध्यमातून प्रयत्न केले.

यानंतर हा भव्य असा उड्डाणलपूल उभारण्याच्या कामाला मुर्त स्वरुप येऊ लागले. पुलाचे डिझाईन करण्यास माती परीक्षणसाठी खोल खड्डे घेण्यात आले. याची सुरुवात २९ जुलै २०२० रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे शुभ हस्ते करण्यात आली. यानंतर एनएचएआयने उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या कामाची वर्कऑर्डर काढली. या कामाकरिता दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. 

परंतु कोविड काळातील लॉकडाऊनमुळे आणखी ८२ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. नियोजित कामानुसार हा पुल 9 मार्च २०२३ ला पूर्ण करायचा होता, परंतु खा. विखे यांच्या कार्य तत्परते मुळे तब्बल ११० दिवस आधीच याचे काम पूर्ण करण्यात आले. दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ ला या विकससेतू ठरलेल्या उड्डाण पुलाचे लोकार्पण शानदार सोहळ्यातून करण्यात आले. या उड्डाणपूला करिता तब्बल ३११.१८ कोटी रुपये खर्च करण्यात आला. या विकाससेतूच्या उभारणीत खा. सुजय विखे पाटील यांचा पाठपुरावा हा महत्त्वाचा दूवा ठरला.

प्रवास झाला सुसह्य..

अहमदनगर शहरातील अंतर्गत वाहतूक तसेच पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांमुळे कोंडी ही नित्याचीच ठरलेली होती. परंतु या विकाससेतूमुळे प्रवास सुसह्य झाला आहे. पुण्याकडून येणारी वाहने या उड्डाणपूलाच्या माध्यमातून थेट शहराबाहेर जाऊ शकतात. शहरातील वाहतूकीशी याचा कोणताही संबंध येत नसल्याने कोंडी टाळता आली आहे. यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेतही बचत झाली आहे.

उड्डाणपुलाच्या स्तंभांवर साकारली शिवसृष्टी..

खुप वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या असलेल्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण केल्यावर सुशोभीकरण करण्यात आले. उड्डाणपुलाच्या ३५ आधार स्तंभांवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग चित्रित करून शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणा पासून ते राज्याभिषेक पर्यतचे सर्व प्रसंग हे या शिवसृष्टीचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी रयतेसाठी केलेल्या सुविधा जसे की दुष्काळात अन्नधान्य उपलब्ध करून देणे, गावागावात पाटपाण्याची व्यवस्था करणे, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आदेश काढणे, महिलांचा सन्मान करणे, आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान करणे अशा सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे.

या उड्डाणपूलावर तिरंग्यामधील तीनही रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याबरोबरच सक्करचौक, एसबीआय चौक येथे येणाऱ्या पिलरला झाडांचा आकार देऊन चौक सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन पिलर मधील जागे मध्ये झाडे देखील लावण्यात येवून सुंदर असा बगीचा तयार करण्यात आला आहे.

उड्डाणपूल होणार होणार म्हणून दहा ते बारा वर्षांचा कालावधी गेला. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वारंवार वाहतूकीची कोंडी होत होती. घराबाहेर पडायचे म्हटले तरी नको वाटायचे. परंतु खा. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा उड्डाणपूल पुर्ण झाल्याने वाहतूकीची समस्या सुटली आहे. असे विकासाभिमुख नेतृत्व अहमदनगरला मिळाल्याने विकासरथही गतीमान आहे.

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील कुटूंबाचे महत्त्वाचे योगदान आहे. आता खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध प्रकल्प, विकासकामे मार्गी लागत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहमदनगरमधील उड्डाणपूलाचे काम त्यांच्या अविरत परिश्रमामुळे होऊ शकले. या उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा तर मिळाला, याबरोबरच वेळेची व इंधनावरील खर्चातही बचत झाली.

मराठवाडा व विदर्भ वासियांकडूनही विशेष धन्यवाद!

मराठवाडा व विदर्भकडून पुण्या-मुंबईकडे जाण्यासाठी अहमदनगरहूनच जावे लागते. या प्रवासादरम्यान अहमदनगर शहरातील वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ या वाहनांवर यायची. परंतु आता हा उड्डाणपूल पुर्ण झाल्याने मराठवाडा व विदर्भा कडून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहने थेट शहराबाहेर जाऊ शकत आहेत. यामुळे  त्यांचा प्रवास गतीमान झाला असल्याने त्यांच्या कडूनही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना धन्यवाद दिले जात आहेत!

***संकलन व लेखन :- रामदास पाटील (लेखक खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत (PRO).)

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !